जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची जागा दाखवली

नगर, ४ डिसेंबर: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे. विधान परिषदेच्या सहा जागा जागांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भारतीय जनता पक्षाला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली. भारतीय जनता पक्षाचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.’
दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू” (We understood power of MahaVikas Aghadi and next time we will contest election with new strategy).
News English Summary: NCP MLA Rohit Pawar has said that, although this election was a matter of prestige for the Bharatiya Janata Party, it was a matter of loyalty for the Mahavikas Aghadi. In this election, the people showed their ‘place’ to the Bharatiya Janata Party by retaining the seat of the Mahavikas Aghadi in their minds. Therefore, there is no problem for the Bharatiya Janata Party in Maharashtra to start working honestly as an opposition party in the true sense of the word.
News English Title: NCP MLA Rohit Pawar strong message to BJP party after MLC election result news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO