22 December 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी | अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या | पण...

NCP MLA Rohit Pawar, Eknath Khadse, Resign BJP

मुंबई, २१ ऑक्टोबर: गेले अनेक दिवस भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्याच. त्यानंतर भाजपला रामराम करत ते राष्ट्रवादीची वाट धरणार अशा चर्चांणा देखील उधाण आले होते. मात्र, अखेर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. २३ ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावरुन भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात असली तरी त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खास ट्विट केलं आहे. “निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते” असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते. WelCome एकनाथ खडसे साहेब!” असं म्हणत रोहित पवार यांनी खडसेंचं पक्षात स्वागत केलं आहे.

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has specially tweeted about Khadse’s NCP entry. It is a law of nature, Rohit Pawar has tweeted that recruitment starts after low tide. He tweeted about it from his Twitter account. The NCP has taken a turn for the worse ‘, such news was coming a year ago. But the law of nature is, the tide starts after the low tide. WelCome Eknath Khadse Saheb! Saying this, Rohit Pawar has welcomed Khadse to the party.

News English Title: NCP MLA Rohit Pawar tweet after Eknath Khadse resignation to join NCP News updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x