21 April 2025 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला

MLA Rohit Pawar, Devendra Fadnavis

मुंबई, 20 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘शरद पवार यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी १९ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. भाजप कोरोनासंदर्भात महाराष्ट्र बचाव आंदोलन करणारा आहे. या आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी फडणवीस आणि इतर नेते मंडळींनीही भेट घेतली होती.

या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कोणतंही विशेष पॅकेज जाहीर केले नाही असं सांगत सरकारवर आरोप केले. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ट्विटरमध्ये असं म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस, जी आरोप-प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरु शकेल असा टोला लगावला.

 

News English Summary: If we introspect what we do for the state without worrying about Saheb’s letter, it will definitely be beneficial for the state, ‘said NCP MLA Rohit Pawar in reply to Leader of Opposition Devendra Fadnavis.

News English Title: NCP MLA Rohit Pawar tweet on opposition leader Devendra Fadnavis on Sharad Pawar News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या