नगर | राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या भाजप कार्यालय भेटींमुळे भाजपमध्ये चिंता

अहमदनगर, ०२ जून | अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रीचे आमदार संग्राम जगताप यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बोलावण्याच्या मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. अहमदनगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार जगतापांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी देखील त्यामुळे या भेटीची दखल घेऊन शहरातील पक्षाच्या आणि महानगपालिकेतील पदाधिकार्यांना त्याचा जाब विचारल्याचे समजते. मात्र, पक्ष पदाधिकार्यांकडून याचा इन्कार केला जात आहे.
मागच्या आठवड्यात गांधी मैदानातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात महापौर बाबासाहेब वाकळे व शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्यासह काही नगरसेवक व पक्ष पदाधिकारी असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आ. जगताप या कार्यालयात आले. अर्धातास थांबून नंतर ते निघून गेले. त्यावेळीच राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या कार्यालयात गेल्याच्या या वृत्ताची जोरदार चर्चा शहरात होती. मनपाच्या माध्यमातून शहरात कोणती विकास कामे करता येतील, याबाबतची चर्चा त्यावेळी जगतापांशी झाल्याचे भाजप पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले होते. तर खुद्द जगतापांनी मात्र या भेटीवर काहीच भाष्य केले नव्हते. प
पत्रकारांनी विचारल्यावर, तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या शहरात काय चालू आहे ते असे संदिग्ध, पण आगामी महापौर निवडणुकीच्यादृष्टीने सूचक वक्तव्य करून संभ्रम वाढवला होता. या पार्श्वभूमीवर आता शहरातील संघ परिवारातून मात्र आमदार जगतापांना भाजप कार्यालयात बोलावण्याच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली गेली आहे व ती मुंबईतील पक्षश्रेष्ठींपर्यंतही गेल्याने त्यांनीही त्याचा जाब शहरातील व मनपातील आपल्या पदाधिकार्यांना विचारल्याचे समजते. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी सरकार आहे आणि भाजप विरोधात असून, सत्ताधारी संधी मिळेल तेथे भारतीय जनता पक्षाला व केंद्रातील मोदी सरकारला टार्गेट करीत आहेत. अशा स्थितीत स्थानिक राजकारणाचा विषय असला तरी भाजप-राष्ट्रवादीच्या सार्वजनिक भेटीचे व मैत्रीचे चुकीचे संदेश पक्ष समर्थकांमध्ये जात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढे अशा भेटी टाळण्याची तंबीही दिली गेल्याचे सांगितले जाते.
News English Summary: The repercussions of last week’s call for NCP MLA Sangram Jagtap to the BJP office in Ahmednagar have begun to reverberate. Some Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) office bearers in Ahmednagar have expressed displeasure over MLA Jagtap’s visit to the BJP office.
News English Title: NCP MLA Sangram Jagtap to the BJP office in Ahmednagar increases worry of BJP party news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA