नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीची आ. शिवेंद्रराजेंना थेट ऑफर
सातारा, १६ फेब्रुवारी: साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पॅनेल उभं करण्यात आलं असून दीपक पवार या निवडणुकीचं नेतृत्व करतील असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. परंतु यावेळी राष्ट्रवादीकडून शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर देण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत आल्यास नगरपालिका निवडणुकीचं नेतृत्व शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देऊ असं जाहीर केलं आहे. नेतृत्व कोण करणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी, “शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर ते करतील. नाही आले तर मी आणि दीपक पवार करु”, असं उत्तर दिलं. शशिकांत शिंदेंच्या या ऑफरवर शिवेंद्रराजे भोसले या काय उत्तर देतात हे मात्र आता पहावं लागणार आहे.
दुसऱ्याबाजूला शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिलेली आहे. “माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,” अशा शब्दांत शिवेंद्रराजे भोसले यांनी आव्हान दिलं आहे. साताऱ्यातील जावळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेलं हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
News English Summary: Speaking to the media, Shashikant Shinde has announced that if he joins the NCP, he will hand over the leadership of the municipal elections to Shivendra Raje Bhosale. Speaking to reporters, Shashikant Shinde said, “If Shivendra Raje joins the NCP, he will do it. If not, Deepak Pawar and I will do it ”, he replied. It remains to be seen how Shivendra Raje Bhosale responds to Shashikant Shinde’s offer.
News English Title: NCP MLA Shashikant Shinde gave offer to BJP MLA Shivendra Raje Bhosale news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम