डॉक्टरांनी रेमडिसिवीर इंजेक्शन लिहून दिलंय, पण ते मिळत नाही, आता काय करावे? | डॉ. अमोल कोल्हे सांगतात...

मुंबई, १७ एप्रिल: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना या उपचारांत वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा झाला आहे. दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार आता रुग्णांच्या जिवावर उठला आहे. तो थांबवण्यासाठी रामबाण म्हणून आता प्रशासन सज्ज झाले असून हे इंजेक्शन आता फक्त रुग्णालयांनाच देण्यात येणार आहे. औषध दुकानांत रेमडेसिविरच्या विक्रीस बंदी घालण्यात आली असून हा काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांवर या इंजेक्शनच्या वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अर्थातच गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन माफक दरात दिले जावे, हा यामागील उद्देश आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या बातम्या राज्यभरातून येत आहेत. असा काळाबाजार करणाऱ्या तिघांना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर पाेलिसांनी शुक्रवारी अटक केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायी आरोग्य सेवा अपूरी पडताना दिसत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव मुठीत आला आहे.अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेमडेसिवीरला पर्यायी कोणतं औषध आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली आहे.
‘रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे? लक्षात घ्या, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर हे सुचवलं आहे. ते रुग्णाला द्यावं. शासन व प्रशासन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,’ अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर पुरवठ्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे अशी माझी नम्र विनंती आहे,’ असंही डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे?https://t.co/hbj0LZYQdJ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 16, 2021
News English Summary: The number of corona patients in Maharashtra is increasing day by day. Alternative health care seems to be in short supply. The relatives of the patients have lost their lives while getting the injection of remedivir given to these coronary patients during treatment. Amol Kolhe has informed the citizens about the alternative medicine to Remedesivir.
News English Title: NCP MP Dr Amol Kolhe requested on Remedesiver injection shortage issue news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल