23 February 2025 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार – सुप्रिया सुळे

NCP MP Supriya Sule, BJP Responsible, Pune City

पुणे, १५ ऑक्टोबर : पुण्यात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे. तर कात्रज येथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. कात्रज परिसराला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि पाहणी केली. कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार आहे, असे थेट आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

कात्रज परिसरातील विश्वकर्मा नगर येथे पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. त्यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पुणे शहरात दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे कात्रज येथील संरक्षक भिंत कोसळली होती. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावर उपयोजना करण्यासाठी महापौर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात वेळोवेळी मांडली.” मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीकडे महापालिकेत सत्ताधारी भाजपाने नेहमी दुर्लक्ष केलं अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

 

News English Summary: It has been raining in Pune since last night. This has led to backlog in many places. Many have had their homes flooded. The situation in Katraj is very bad. The situation has deteriorated due to torrential rains. MP Supriya Sule visited and inspected the Katraj area today. MP Supriya Sule has directly accused the corporation of being responsible for the situation in Katraj.

News English Title: NCP MP Supriya Sule Said BJP is responsible For Damage Cause By Rain In Pune City News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x