23 January 2025 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा Salary Vs Saving Account | सॅलरी आणि बचत खात्यात नेमका फरक काय, व्याजदर आणि मिनिमम बॅलेन्सचे नियम लक्षात ठेवा Penny Stocks | श्रीमंत करणार हा 1 रुपयाचा पेनी शेअर, 5 दिवसात 22% कमाई, यापूर्वी 857% परतावा दिला - BOM: 511012 Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला, तज्ज्ञांकडून मोठे संकेत - NSE: IREDA
x

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव

NCP Party, Raju Shetti, MLC Election 2020

कोल्हापूर, ११ जून: एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनाच विधानपरिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याने राज्यपाल नियुक्त जागा असल्या, तरी या नियुक्तीवर चर्चा सुरू झाली आहे.

भाजपशी फारकत घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना आमदारकीचा हा प्रस्ताव दिला आहे. याला शेट्टी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला आहे. दोन दिवसात राजू शेट्टी या प्रस्तावावर विचार करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यानंतर राजू शेट्टी यांच्या आमदारकीबाबतअंतिम निर्णय होणार आहे.

दरम्यान, याविषयी राजू शेट्टींनी सध्या मौनच बाळगणं पसंत केलं आहे. ‘सध्या प्राथमिक चर्चा सुरू झाली असून यापुढे देखील यावर चर्चा सुरू राहील’, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ऑफरवर राजू शेट्टी सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

News English Summary: Former MP Raju Shetty, the leader of Swabhimani Shetkari Sanghatana, which has split from the BJP, has been offered the MLA post from the NCP quota. NCP state president and minister Jayant Patil has proposed Raju Shetty for the MLA post. This has received a response from Shetty.

News English Title: NCP party offers Raju Shetty MLC in Maharashtra Vidhan Parishad News latest updates.

हॅशटॅग्स

#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x