15 November 2024 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

महागाईने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला, लोकांना जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलंय - राष्ट्रवादीचं आंदोलन

Sharad Pawar

पुणे, १३ मे | देशातील 5 राज्यातील निवडणुका संपताच पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोलमध्ये वाढ होऊन तो शंभरीच्या जवळ आला आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंधनाच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. याचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही पडले असून राज्यात सर्वात महाग पेट्रोलची नोंद परभणीत झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून देशातील 5 राज्यांत निवडणुक सुरु होत्या. दरम्यान, कच्चे तेल महाग झाल्यानंतरही पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती. तथापि, कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर चार हप्त्यांमध्ये कमी करण्यात आले होते. परंतु, आता निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. परिणामी सामान्यांना महागाईचा देखील फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पुण्यात निदर्शनं करण्यात आली.

मोदी सरकारने जनतेला महागाईपासून मुक्तीचे… अच्छे दिन येणार हे स्वप्न दाखवले. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला परंतु जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढवले की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदवण्यात आला.

देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्रसरकारच्यावतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे.पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्रसरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्रसरकारचा, व वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज (१३ मे) राज्यभर आंदोलन करण्यात आले.

 

News English Summary: Inflation has also begun to hit the common man. Therefore, the NCP is now on the streets against inflation. Demonstrations were held in Pune following the rules of social discrimination.

News English Title: NCP party protest against inflation at Pune news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x