27 January 2025 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

आम्ही आणि सर्व मंत्री फिल्डवर | सर्वांनी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करीत आहेत

NCP President Sharad Pawar, CM Uddhav Thackeray, Working from home

तुळजापूर, १९ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न विरोधकांनी उचलून धरत टीका केली होती. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. करोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला, इतर मंत्री फिल्डवर होते, आम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करीत आहेत, असे पवार म्हणाले. तुळजापूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात भूकंप, अतिवृष्टी किंवा अन्य कुठलंही संकट असो… अशा संकटात शरद पवारच घटनास्थळावर सर्वात आधी कसे पोहोचतात?, असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी मला गप्प बसवत नाही म्हणून मी येतो, असं मिश्किल उत्तर दिलं आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहीणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. राज्यातील जनता स्थानिक पातळी, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्या ठिकाणी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. आता संकटकाळी मी शांत कसा बसू? लोकांचा विश्वास माझ्यावर असल्यामुळेच मला स्वस्थ बसवत नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार कालपासून उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार यांनी ‘ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं’, असं उत्तर देत वेळ मारुन नेली. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंती केल्याचंही पवारांनी सांगितलं. आम्हा सर्वांच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्वीकारल्याचं पवारांनी यावेळी आवर्जुन मात्र, अतिवृष्टीमुळं आलेलं संकट मोठं असल्यानं मुख्यमंत्रीही आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचंही पवार सांगायला विसरले नाहीत.

तसेच महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे. संपूर्ण संकटाचं ओझं एकट्या राज्य सरकारला झेपेल का?, केंद्र सरकारला मदत करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला ही बातमी वाचली, निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात बोलतो, पण अशा संकटावेळी मदत करण्याची भूमिका घेतो, कारण हे राष्ट्रावरील संकट आहे. देशाच्या संकटांना तोंड देण्यासाठी सगळे एकत्र येतो, भाजपा सरकार असताना गुजरातमध्ये भूकंप झाला त्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली होती, निर्णय घेताना पक्ष बघितला जात नाही, संकटग्रस्त माणसांना त्यातून बाहेर कसं काढता येईल यासाठी सगळेच प्रयत्न करूया असंही शरद पवार म्हणाले.

 

News English Summary: Why doesn’t Chief Minister Uddhav Thackeray fall out of the house? This question was raised by the opposition. Speaking on this, NCP leader Sharad Pawar has followed Chief Minister Uddhav Thackeray. “In the crisis, Karona requested the chief minister to sit in one place and take stock. The other ministers were on the field. The chief minister is acting as per the responsibility given to us,” Pawar said. He was speaking at a press conference in Tuljapur.

News English Title: NCP President Sharad Pawar gives the reason behind why CM Uddhav Thackeray working from home news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x