22 December 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास खलबतं, कारण गुलदस्त्यात

Sharad Pawar

मुंबई, २६ मे | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एक बैठक झाली आहे. शरद पवार हे सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर शरद पवार आणि मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 40 मिनिटे बैठक झाली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास पवारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीच्या संदर्भात अधिकृत माहिती मिळाली नसली तरी मराठा समाजाला विश्वासात कसं घ्यायचं या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

 

News English Summary: A meeting has been held between Chief Minister Uddhav Thackeray and NCP supremo Sharad Pawar. Sharad Pawar arrived at the Chief Minister’s official residence Varsha in the evening. After that Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray had a meeting for about 40 minutes

News English Title: NCP President Sharad Pawar meet CM Uddhav Thackeray after a month news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x