15 November 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

महाविकास आघाडी त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही | म्हणून केंद्रातील सत्तेचा गैरवापर - शरद पवार

NCP President Sharad Pawar, ED action, Shivsena Pratap Sarnaik,

बीड, २४ नोव्हेंबर: ठाण्यातील आमदार आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (Thane Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय (ईडी)च्या टीमने छापा टाकला आहे. तसंच प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे मोठे नेते अशी ओळख असणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्या घरी थेट छापेमारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या गेल्या काही वर्षांमधील व्यवहारांची तपासणी ईडीकडून करण्यात येणार आहे. तसेच काही कागदपत्रांची देखील पुर्नपडताळणी केली जात आहे.

दरम्यान शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

दुसरीकडे ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिवसातून दहा वेळा भाजपवर टीका केल्याशिवाय झोप लागत नाही,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात मारला. ‘ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाईमध्ये केंद्राचा कोणताही हात नसतो. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नसल्याचा खुलासाही पाटील यांनी केला. इडीच्या कारवाईबाबत आरोप करणे म्हणजे विरोधकांना संविधान अमान्य असल्याचा,’ आरोपही त्यांनी केला.

 

News English Summary: Instead of answering questions of people, govt agencies are being used against political opponents. This is not suitable. Our govt has completed a year so they know now that they can’t come to power here. So they are using power they have in the Centre said NCP chief Sharad Pawar

News English Title: NCP President Sharad Pawar on ED action against Shivsena Pratap Sarnaik BJP News updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x