15 November 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

पवार पावसात भिजले | आणि भाजपचं सत्तेचं स्वप्न गारटलं | त्या सभेची वर्षपूर्ती

NCP President Sharad Pawar, Satara rally, Maharashtra assembly election 2019

सातारा, १८ ऑक्टोबर : महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी प्रचंड गाजली. या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, अन्य पक्षांची अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. याचदरम्यान, प्रचंड गाजली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातली प्रचारसभा. आज शरद पवारांच्या या प्रचारसभेला वर्ष पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचले आहे.

राष्ट्रवादीने भाजपला डिवचताना आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे कि, “त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, शरदपवार संपले. पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली.” वर्षभरापूर्वीच्या शरद पवारांच्या त्या ऐतिहासिक सभेची आठवण करून देत राष्ट्रवादीने भाजपवर हा थेट निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या ‘त्या’ एका सभेने स्वतःच्या बालेकिल्ल्यातून उदयनराजेंचा अत्यंत दारुण पराभव गेला. उदयराजे ‘त्या’ साताऱ्यातील भर पावसातील सभेचा राजकीय बळी ठरले अशी जोरदार टीका त्यावेळी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढला. अजून मी म्हातारा झालेलो नाही, असे म्हणत पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली. एकीकडे भाजपकडून नरेंद्र मोदींपासून अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून केवळ शरद पवार अशात प्रचारात होते. शरद पवार यांनी बीड, बारामतीची सभा करून साताऱ्याची सांगता सभा करायचे ठरविले होते. पण, त्यादिवशी निर्माण झालेले ढगाळ वातावरण पाहता साताऱ्याची सभा होईल का नाही, याबाबत शंका होती.

पाटणच्या सभेला थोडा उशीरच झाला. तेथेच पाऊस सुरू झाला होता. साताऱ्याची सभेबाबत चिंता व्यक्त केली गेली.आधी चार दिवसांपूर्वी भाजपची विभागीय सभा झाली होती. त्यामुळे साताऱ्याची राष्ट्रवादीची सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. “लोकसभेमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. “एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय, पण आता ती चूक सुद्धरविण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील प्रत्येक तरुण आणि वडील धारी व्यक्ती २१ तारखेची वाट बघत आहे. आपल्या मतांनी निर्णय देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे भर पावसात सभा संबोधित करत उपस्थितांना आवाहन केले. ”

 

News English Summary: Maharashtra’s 14th Assembly elections were huge in many ways. Before the Assembly elections, many Congress-NCP leaders defected from the BJP-Shiv Sena, the politics of the state stirred against this backdrop, veteran political leaders accusing each other, the growing strength of the BJP-Shiv Sena, the struggle for survival of many other parties. Meanwhile, NCP President Sharad Pawar’s campaign rally in Satara was very loud. Today marks the end of Sharad Pawar’s campaign year. Against this backdrop, the NCP has now pushed the BJP again.

News English Title: NCP President Sharad Pawar Satara rally in rain during Maharashtra assembly election News updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x