22 January 2025 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

मिशन पक्षविस्तार | शरद पवार २०-२१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

NCP President Sharad Pawar, North Maharashtra tour, Eknath Khadse

मुंबई, १६ नोव्हेंबर: एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचं समजलं जात आहे. शरद पवार उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार इथ शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणार आहेत.

भारतीय जनता पक्षामध्ये अन्याय झाल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शरद पवार २० आणि २१ तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

 

News English Summary: Eknath Khadse had started pushing the BJP at the local level after he had joined the NCP. Within a few days, he had brought several BJP office bearers into the NCP and started giving political push to the Bharatiya Janata Party in Khandesh. After that, now Sharad Pawar was also ready for the expansion of NCP in Khandesh.

News English Title: NCP President Sharad Pawar will be on North Maharashtra tour news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x