29 January 2025 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्टाची प्रत्येक महिन्याला नफा मिळवून देणारी फायद्याची योजना, महिन्याला मिळतील 9250 रुपये Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT
x

राज्यातील सरकार स्थापनेवरून आज दिल्लीत घडामोडी

CM Devendra Fadnavis, Sonia Gandhi, Amit Shah, Sharad Pawar, Maharashtra Vidhansabha Election 2019

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाच्या बैठका, चर्चा आणि भेटीगाठीचा असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस भाजपश्रेष्ठींना भेटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सत्तास्थापनेमधल्या तिढ्यावर ते या भेटीत चर्चा करणार आहेत.

दरम्यान, खासदार राऊत हे सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले. सरकार स्थापनेसाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षास सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे, अशी विनंती राऊत राज्यपालांना करणार आहेत. यामुळे तर्कवितर्काना उधाण आले आहे.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x