13 January 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मुख्यमंत्री तेल लावल्यावर कसे दिसता जरा कळू द्या; तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा: जयंत पाटील

CM Devendra Fadnavis, NCP Leader Jayant patil

सांगली: तेल लावलेला पैलवान विषयावरून राष्ट्र्वादीने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधक कमजोर दिसत असल्याने निवडणूक एकतर्फी होणार असं वाटू लागल्याने ते सभांमध्ये वारंवार त्याचा उल्लेख करत आहेत. युतीशी सामना करण्यासाठी तुल्यबळ विरोधकच शिल्लक न राहिल्याने निवडणूक एकतर्फी होणार आणि आमच्या विरुद्ध तूल्यबळ विरोधक म्हणजे पैलवानंच नसल्याचं मुख्यमंत्री टोला लगावत आहेत.

मात्र आता फडणवीसांच्या त्याच शब्दाचा उल्लेख करत एनसीपीने त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. ‘शरद पवार यांच्याविरोधात कट-कारस्थान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी जनता एकवटली आहे,’ असं म्हणत ईडीच्या मुद्द्यावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सांगलीत बोलताना जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

‘आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे पैलवान आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले फोटो लावलेला प्रसिद्ध करावा. एकदा कळू द्या तेल लावल्यावर कसे दिसत आहेत,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेली खालच्या स्तरातील टीका महाराष्ट्र सहन करणार नाही,’ असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून काँग्रेस-एनसीपी आघाडीची सत्ता येणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. एनसीपीच्या प्रदेशाध्यक्षांच्या या दाव्याला भाजप आणि शिवसेना कसं उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x