24 November 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

८० वर्षाच्या तरुणाचं भर पावसात भाषण; कार्यकत्यांना सुद्धा स्फूर्ती

NCP Sharad Pawar, Satara, Udayanraje Bhosale, Maharashtra Vidhansabha Election 2019

सातारा: साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पावसात केलेली तुफान फटकेबाजी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या वयातही शरद पवार यांनी दाखवलेल्या जिद्दीचं सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. पाऊस सुरु असतानाही शरद पवार यांनी सभा न थांबवता उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केलं. विशेष म्हणजे व्यासपीठावर येताना शरद पवार यांच्या डोक्यावर छत्री धरलेली होती. पण शरद पवार यांनी ही छत्री दूर केली.

झालं असं की, शरद पवारांच्या सभेसाठी मैदानात कार्यकर्ते आणि समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. पवारांचं भाषण सुरु होण्याच्या आधीपासून पावसाची संततधार सुरु होती. पण पावसातही कार्यकर्ते मैदानात थांबून होते. शरद पवार व्यासपीठावर आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर छत्री होती. पण समोर कार्यकर्ते भिजत असल्याचं पाहून शरद पवारांनी छत्री घेण्यास नकार दिला आणि पावसात भिजतच उपस्थितांना संबोधित करायचं ठरवलं.

महायुतीच्या जागावाटपाला उशीर झाल्यानं राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार काहीसा उशिराच सुरू झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज सत्ताधारी भाजपमध्ये गेल्यानं विरोधी आघाडीवरही शांतता होती. मात्र, शरद पवार यांच्यावर ‘ईडी’नं गुन्हा दाखल केल्यानंतर वातावरण फिरले. ‘ईडी’चा समाचार घेतल्यानंतर पवार प्रचाराच्या मैदानात उतरले. त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सभा घेऊन त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरू केला. मिश्किल आणि गावरान भाषेतील त्यांच्या भाषणाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मोदी, शहा यांच्यापेक्षा पवारांच्याच भाषणांची चर्चा राज्यभरात सुरू आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्न माहीत असलेल्या पवारांनी हे प्रश्न लोकांपुढं मांडत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देत आहेत.

तत्पूर्वी भरपावसात काल रात्री 8 वाजता पवारांची साताऱ्यात सभा सुरू होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांचं हे रूप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता. पावसात भिजत उपस्थित नागरिकांनीही सभेला गर्दी केली होती. आपल्या खिशातील रुमाल काढून, डोक्यावर छत्री घेऊन कार्यकर्त्यांनी सभेला प्रतिसाद दिला.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x