17 April 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

अशा कठीण प्रसंगी सुद्धा सरकारवर संकट येण्याच्या शेरोशायरी, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते

Amruta Fadnavis

मुंबई, १८ मे | कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.

यापूर्वी देखील त्यांच्या अनेक ‘निरर्थक ट्वीट्स’ला प्रसार माध्यमांनी ‘सूचक ट्विट’ असं संबोधल्याने त्यांच्या वायफळ ट्विटपणाला अनेकदा खतपाणी मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. काल त्यांनी पुन्हा कोरोना आपत्ती आणि वादळाच्या विचारात शहरं आणि राज्य व्यस्त असताना एक निरर्थक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. ट्विट केलं वगरे ठीक आहे, पण त्यात ‘देखें अबके किसका नंबर आता है !’ अशी निरर्थक ओळ देखील ट्विट केली होती.

काय आहे अमृता फडणवीस यांचे ट्विट?
‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर, सरकारवर त्याचे काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत.

याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उमेश पाटील यांनी एका मराठी टीव्ही टीव्ही वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले.

 

News English Summary: NCP spokesperson Umesh Patil has criticized Amrita Fadnavis. Umesh Patil, while interacting with a Marathi TV news channel, took good news from Amrita Fadnavis. The former Chief Minister has suffered as much as the former Chief Minister. So they do sheroshire out of discomfort. In such a difficult situation, it is not right to say that the government will face a crisis, which shows their lust for power.

News English Title: NCP spokesperson Umesh Patil has criticized Amrita Fadnavis over her tweet during corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या