23 February 2025 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

OBC आरक्षणाला धक्का लावण्याबाबतचा विरोधक गैरसमज पसरवत आहेत – जयंत पाटील

NCP State President Jayant Patil, OBC Reservation, Maratha Reservation

मुंबई, १३ ऑक्टोबर : ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जातोय. मात्र धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी दौरे करुन पक्ष मजबूत करण्याचे काम करत आहेत त्याबद्दल कौतुक केले.
अठरा पगडमधील जमातींवर कोरोनाचे संकट आले होते. त्या काळात ईश्वर बाळबुद्धे हे सरकारला उपाययोजना सांगत होते. काही राजकीय पक्ष मंदीर उघडा बोलत आहेत परंतु महाराष्ट्रात जेवढं आम्ही ओपन करत आहोत तेवढा कोरोना वाढला आहे. त्यामुळे एकत्रित माणसं गोळा होण्याचं टाळलं पाहिजे.

सर्व धर्माच्या देवांनी लोकांनी गर्दी करु नका हे स्वीकारले आहे. आम्ही उपजीविकेची साधने ओपन केली आहेत. नवरात्र उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करावा असे स्पष्ट केले आहे. आम्ही मर्यादित तत्वावर काम करतोय. त्यामुळे सर्वच धर्मांना विनंती करतोय. ज्यांना धर्माशिवाय जमत नाही ते धर्माचे राजकारण करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

 

News English Summary: Opponents are spreading the misconception that OBC is going to push the reservation. However, NCP state president Jayant Patil said in a review meeting of the OBC cell that the NCP would not support any such action or incident in Maharashtra.

News English Title: NCP State President Jayant Patil talked about OBC Reservation News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x