26 December 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar

पुणे, १७ मे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची लसीकरणावरून पोलखोल करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार दिनांक २७ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत नागराज नायडू यांनी मोदी सरकारच्या वतीने जाहीरपणे UNO मध्ये माहिती देताना म्हटलं होतं की “आम्ही आजच्या तारखेपर्यंत भारतीय नागरिकांच्या लसीकरणापेक्षा सर्वाधिक लस जगभरात पुरवली आहे”.

त्याच विषयाचा संदर्भ घेत रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून टीका केली आहे. त्यांनी पोस्टबरोबर एक व्हिडीओही शेअर केला आहे. घरात नाही दाणा, पण मला “व्हॅक्सिन गुरू” म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

 

News English Summary: NCP state president Rupali Chakankar has also criticized the central government over the vaccine. Rupali Chakankar has criticized the Modi government at the Center.

News English Title: NCP state women’s president Rupali Chakankar slams Modi govt over export of vaccine to foreign countries news updates

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x