22 December 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असे सर्व पक्ष समभाव विचारांचे नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता

Suresh Mhatre

CM Eknath Shinde | शिवसेनेतल्या बंड्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. पण, आता लक्ष लागलंय ते दसरा मेळाव्यांकडे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना फुटून दोन मेळावे होत आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी ताकद दाखवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलीये. शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात आलंय. तसंच नियोजन उद्धव ठाकरेंकडूनही करण्यात आलंय.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळालं. मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे. त्याचबरोबर लक्ष असणार आहे गर्दी कुणाकडे असणार. तर शिंदेंपेक्षा जास्त ताकद दाखवण्यासाठी ठाकरेंनीही प्लानिंग केलंय.

दरम्यान, उद्या शिंदे गट पुन्हा लोकं आपल्याकडे येतं असल्याचं भासविण्यासाठी काही लोकांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणणार आहेत. दरम्यान, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे म्हात्रे यांनी त्यांचा राजीनामा पाठवला आहे. आपण आपल्या वैयक्तिक कारणाने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

सुरेश म्हात्रे यांचा राजकीय इतिहास राजकीय पक्षाच्या भ्रमंतीने भरला आहे. सुरेश म्हात्रे हे प्रथम शिवसेनेत होते त्यानंतर ते मनसे, भाजपा, पुन्हा शिवसेनेत गेले त्यानंतर आता राष्ट्रवादीत गेले होते मात्र तिथेही राजीनामा दिल्याने आता ते शिंदे गटात जाण्याची शक्यता सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCP Thane district Suresh Mhatre resigns from party likely to join Shinde camp check details 04 October 2022.

हॅशटॅग्स

#Suresh Mhatre(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x