29 April 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER
x

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर

Mangaldas Bandal, Junnar, Shirur, NCP, Shivsena, Assembly Election 2019

आंबेगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. मंगलदास बांदल आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासकामांच्या भुमिपुजनानिमित्त एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षाकडून विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडका सुरु आहे. शिरूर मतदारसंघातही शिवसेनेकडून हाच कित्ता गिरवला जात आहे. मात्र, यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत मंगलदास बांदल यांची उपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे. मंगलदास बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत ते अनेकदा दिसून आल्याने बांदल लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, असे सांगितले जाते. आगामी निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकीटावर दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony