15 November 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

जीजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साप करायला वेळ लागणार नाही

BJP Leader Babanrao Lonikar, NCP Leader Rupali Chakankar

जालना: माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेते बबनराव लोणीकरांचा चांगलाच समाचार घेतला. जीजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच. याची काळजी तुम्ही करु नका, पण तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साप करायला आम्हाला वेळ लागणार नाही. सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही. त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा, असं म्हणत चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं.

शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. तरच राज्यातील सरकार त्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान देईल. या मोर्चासाठी मी कुणाला आणू हे तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का?, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का?, की एखादी हिरोईन आणू?, हे मला तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईन सारख्याच दिसतात, असे लज्जास्पद विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे. स्टेजवर त्यांचा मुलगा व जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, तहसिलदार मॅडम, सरपंच बसलेले होते. लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर तहसिलदार मॅडम स्टेजवरून उठून गेल्या. परंतु, लोणीकर यांना याविषयी काहीच वादग्रस्त वाटले नाही. मी जे काही बोललो त्यात काहीच वावगं नाही, असे लोणीकर म्हणत आहेत.

लोणीकरांच्या या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लोणीकरांच्या या वक्तव्याचा महिला संघटनांनी निषेध केलाय. राष्ट्रवादीनं लोणीकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. “बबनराव लोणीकरांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. भारतीय जनता पक्षाची संस्कृती रसातळाला गेली आहे. महिला अधिकाऱ्याचा सन्मान करणं आवश्यक आहे. एका महिलेबाबत असं वक्तव्य करणं विनयभंगाचा गुन्हा आहे,” असं राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनीही लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषध केला आहे.

तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. वर्षा देशपांडे म्हणाल्या, “बबनराव लोणीकर कुठल्याही पदावर निवडून आले असले आणि कोणत्याही पक्षाचे असले, तरी यांच्यातील पुरुषी प्रवृत्ती, बाईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल नाही हाच याचा अर्थ आहे. त्यांनी लोकांना गोळा करण्यासाठी हे वक्तव्य केलं आहे. लोकांना जमा करण्यासाठी हिरोईन आणणे आणि त्यासाठी एका गॅझेटेड अधिकाऱ्याचा असा उल्लेख करणं हे निषेधार्ह आहे.”

 

Web Title:  NCP Womens State President Rupali Chakankar criticize former Minister and BJP Leader Babanrao Lonikar.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x