माझे लाईट बील माझी जवाबदारी | समाज माध्यमांवर शिवसेनेची फिरकी
मुंबई, १९ नोव्हेंबर: लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. तत्पूर्वी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याबाबत सांगितलं होतं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबविण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता याच मोहिमेच्या टॅगलाईन बदलून महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला समाज माध्यमांवर लक्ष करण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या ठाकरे सरकार विरोधात रोष वाढत असून विरोधकांच्या आंदोलनामुळे त्यात अजून भर पडू शकते आणि त्याला कारण देखील तसंच आहे. एकही वचन खोटं ठरणारं नाही, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा वचननामा जाहीर केला होता. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा बनवला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. विविध घोषणांसह घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं. पण राज्यातील वाढीव विज बिलांवरुन आता शिवसेनेने दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न निर्माण झालाय.
शिवसेनेने वचननाम्यात विविध घटकांसाठी जी आश्वासनं दिली, त्यात विज दर कमी करण्याचंही आश्वासन होतं. 300 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज 30 टक्क्यांनी कमी करणे, शासनाच्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जानिर्मिती, शाळा, प्रार्थनास्थळे, सरकारी रुग्णालये यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देणे अशी आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता दर लांबची गोष्ट आहे. पण ग्राहकांना सध्या वाढीव विज बिलांचा शॉक मात्र मिळालाय.
News English Summary: Rising power bills during the lockdown will not be waived, Energy Minister Nitin Raut has said. Earlier, Chief Minister Uddhav Thackeray had appealed to everyone to take responsibility for their families as the number of corona patients was increasing. For this, he had said about launching ‘My Family, My Responsibility’ campaign. The campaign was launched from September 15 to October 10. But now the tagline of this campaign has been changed and the Mahavikas Aghadi government and Shiv Sena have started paying attention to social media.
News English Title: Netizens target Shivsena on Social Media over electricity bills news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL