22 November 2024 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावरच, मनसेबरोबर युती नाही - आ. आशिष शेलार

MLA Ashish Shelar

सांगली, १२ जुलै | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय जनता पक्षानेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने बरोबर युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

अॅड. आशिष शेलार आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. यावेळी त्यांना शिवसेना आघाडीत गेल्याने मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन लढणार का? असा सवाल करण्यात आला. त्याला शेलार यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सरकार अंतर्गत वादानेच पडेल:
यावेळी शेलार यांनी ठाकरे सरकारच्या भवितव्यावरही भाष्य केलं. हे सरकार अंतर्गत वादानेच पडेल. सरकारमध्येच विसंवाद आहे. त्यामुळे आम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: No alliance with MNS during BMC election said BJP MLA Ashish Shelar news updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x