19 April 2025 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

वर्षभर तरी नरेंद्र-देवेंद्र सरकारला धोका नाही, भेंडवळ घटमांडणीचं भाकित

बुलढाणा : मित्र पक्षांसोबत अंतर जरी वाढत असेल तरी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वर्षभर तरी स्थिर राहील असं भाकीत सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय. एनडीएमधील घटक पक्ष सध्या भाजपवर नाराज असून एका मागे एक मित्र पक्ष भाजप पासून फारकत घेत आहेत.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपसरकार कार्यकाळ पूर्ण करत की नाही असा प्रश्न उभा होता. परंतु केंद्र आणि राज्य सरकारांना वर्षभर कुठलाही धोका संभवत नसल्याचं भाकित सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय.

भेंडवळ मांडणीमध्ये एका पानावर सुपारी ठेवतात आणि ती सुपारी जर हलली तर ‘राजा’ म्हणजे सरकारची खुर्ची अस्थिर आहे असं मानलं जात. परंतु घटाजवळ ठेवलेली सुपारी जशीच्या तशी होती. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना वर्षभर कुठलाही धोका संभवत नसल्याचं सामाईक पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी जाहीर केलं.

राज्यातील शिवसेना सत्तेत असली तरी ते भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार वर्षभर स्थिर राहील असं भेंडवळचं भाकित आहे. परंतु ते किती खरं हे येणार काळच ठरवेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या