14 January 2025 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

मोदींची महाराजांशी तुलना!...बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? उदयनराजेंचा संताप

PM Narendra Modi, Aaj Ke Shivaji Narendra Modi, Chhatrapati Shivaji Maharaj, Jai Bhagwan Goyal

सातारा: भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

गोयल नावाच्या कुण्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी ते वाचलेले नाही. वास्तविक या जगात महाराजांच्या उंचीपर्यंत कुणीही जाऊ शकणार नाही. एक युगपुरूष कधीतरी जन्माला येतो. ते म्हणजे शिवाजीराजे. तुलना करणाऱ्या लोकांची बुद्धी गहाण ठेवली आहे का?, असा सवाल करत तुलना करणाऱ्या या पुस्तकामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच या तुलनेमुळे वाईट वाटल्याचेही ते म्हणाले.

“एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो,” असं यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. “फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असं यावेळी ते म्हणाले.

आजपर्यंत प्रत्येकवेळेस लुडबूड करणारे लाेक असतात. त्यांचे नाव घ्यायचे नाही मला. वाईट एवढंच वाटतं की काही झालं तरी ब्लेम गेम केला जाताे. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलाे याचा सार्थ अभिमान आहे. मागच्या जन्मी माझ्याकडून चांगलं काम झालं असेल म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. मी हे माझं साैभाग्य माणताे. महाराजांचा वंशज म्हणून नावाचा दुरपयाेग केला नाही. राजेशाही गेल्यानंतर लाेकशाही आल्यानंतर आम्ही लाेकशाही मान्य केली. तुम्ही आम्ही बराेबर आहाेत ही संकल्पना चुकीची नाही. शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव संकल्पना आता कुठे गेली. असा प्रश्न देखील उदयनराजे यांनी उपस्थित केला.

 

Web Title:  Nobody compare Chhatrapati Shivaji Maharaj says former MP Udayanraje Bhonsale on Aaj Ke Shivaji Narendra Modi.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x