राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट जुलैमध्येच सुरू होणार, आहार संघटनेचं स्पष्टीकरण
मुंबई, ६ जून: महाराष्ट्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी पण राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी जुलै महिना उजाडेल, असे
‘आहार’ संघटनेने स्पष्ट केले आहे. हॉटेल व्यवसायातील ८५ ते ९० टक्के कर्मचारी आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे ते परत येईपर्यंत आणि यासंदर्भातील अन्य व्यवस्था पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे ‘आहार’ चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे.
सध्या हॉटेलमध्ये जिथे १०० कर्मचारी होते. तिथे १० कर्मचारीही नाहीत. अशी परिस्थिती आहे. मूळगावी गेलेले कर्मचारी परत आल्यावर त्यांचे काही दिवस क्वारंटाईनमध्ये जातील. तोपर्यंत जुलै महिना उजाडेल. हॉटेल सुरू करायचे म्हटले तर पुरेशे मनुष्यबळ लागते. त्यामुळे सरकारने जरी परवानगी दिली तरी लगेच हा व्यवसाय सुरु करणे शक्य नाही असे शेट्टी यांनी म्हटले आहे.
दरम्यान , हॉटेलचे कर्मचारी आणि ग्राहकांचे तापमान पाहणे , सॅनिटायझर देणे या गोष्टींचे पालन करता येईल. पण काही हॉटेल्स बारा बाय दहाच्या जागेत आहेत .तिथे सहा फुटांचे अंतर कसे ठेवणार असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या लॉकडाऊननंतर ‘पुनश्च हरिओम’ म्हणत निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ही शिथिलता आल्यानंतर पहिल्या महिन्याभरात जेमतेम १० टक्के लोक हॉटेलांमध्ये तर, २१ टक्के लोकच मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातील. मात्र, सर्वाधिक ३२ टक्के लोक हे विविध ठिकाणची प्रार्थनास्थळे उघडण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर ‘लोकल सर्कल’ या संस्थेने देशातील २५४ जिल्ह्यांतील ३२ हजार लोकांचे एक ऑनलाईन सर्वेक्षण केले आहे. त्यात हॉटेल, मॉल आणि प्रार्थनास्थळांत प्रवेश सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्याभरात तुम्ही तिथे जाल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. कोरोनाच्या दहशतीमुळे हॉटेल आणि मॉलमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढणार नाही, असे हा अहवाल सांगतो. त्यामुळे तिथल्या व्यवसायिकांसमोरील आव्हाने आणखी काही काळ कायम असतील, असेच भाकीत वर्तविण्यात आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेले ६६ टक्के पुरुष तर ३४ टक्के महिलांचा समावेश होता.
News English Summary: Even though the Maharashtra government has given permission, the month of July will dawn for the opening of hotels and restaurants in the state, the ‘Aahar’ organization has clarified. Eighty-five to 90 percent of the hotel business has moved to its hometown. Therefore, it will take time for him to return and other arrangements in this regard will be completed, said Shivanand Shetty, president of Aahar association News latest Updates.
News English Title: Now hotels and restaurants in the Maharashtra will start in July says Aahar association News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH