19 April 2025 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल | खडसेंची गर्जना

North Maharashtra, only NCP party, Eknath Khadse

जळगाव, २ नोव्हेंबर: दोन दिवसांपूर्वी भाजपने मुक्ताईनगर मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले होते. त्यात गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाने मागील काही दिवसात घेतलेले पक्ष मेळावे वाया गेल्याच चित्र आहे, कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला नव्हे तर राष्ट्रवादीला महत्व देत एकनाथ खडसे यांचावर विश्वास दाखवला आहे.

कारण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात भारतीय जनता पक्षाला राजकीय हादरे देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगावात विस्तार करण्याचं वचन त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या संकट मोचकांना म्हणजे गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला आहे. कारण जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान या प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आता मी भारतीय जनता पक्षाला माजी राजकीय ताकद दाखवून देतो. आता आणि भविष्यात उत्तर महाराष्ट्रात केवळ एनसीपीच असेल, अशी राजकीय गर्जनाच एकनाथ खडसे यांनी केली. जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाच्या एकूण कार्यपद्धती तसेच एकाधिकारशाहीवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे हे नाराज कार्यकर्ते लवकरच एनसीपीमध्ये जाहीर प्रवेश करतील,” अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली. त्यामुळे भविष्यात उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला राजकीय धक्के बसण्यास आणि राष्ट्रवादीचा पक्ष विस्तार होण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. सध्या जरी पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश होत असले तरी भविष्यात आजी-माजी आमदार राष्ट्रवादीत आणून एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रात भाजप एकावर एक राजकीय धक्के देण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी पक्ष प्रवेशावेळी संकेत दिले होते.

 

News English Summary: Two days ago, the BJP had organized a gathering of office bearers and activists in Muktainagar. In it, Girish Mahajan had stated that not a single office bearer of the Bharatiya Janata Party would leave the party. The party rallies held by the Bharatiya Janata Party (BJP) in the last few days have been wasted, as BJP functionaries have shown faith in Eknath Khadse by giving importance to the NCP and not the BJP.

News English Title: Now in North Maharashtra only NCP party will rule said Eknath Khadse News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या