28 January 2025 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

तिसरी लाट | मुलांची काळजी घेण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या सूचना | नागपूर भाजपकडून लहान मुलं आंदोलनात

OBC Reservation

नागपूर, २६ जून | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

दुसरीकडे, डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डेल्टा प्लस व्हेरिएंटसाठी नवीन गाइडलाईन जारी केली असून देशातील 8 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत 8 राज्यातील मुख्य सचिवांना पत्र लिहले आहे. यामध्ये राज्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटला रोखण्यासाठी कडक पाऊले उचलायला सांगितले आहे. तसेच लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

मात्र, आज नागपूर भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या ठिकाणी लहान मुलांना हातात बॅनर देऊन गर्दीत उभं करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे फडणवीसांच्या देखील ते लक्षात आलं नाही आणि दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही तमा न बाळगता स्वतः एक फोटो ट्विट केला आहे. स्वतःला अभ्यासू नेते समजणारे नेते किती अभ्यासू आहेत त्याचा देखील प्रत्यय आला आहे असंच म्हणावं लागेल.

News Title: OBC political reservation BJP use children’s at Nagpur protest even state is under third wave of corona news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x