यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानेच

रायगड, ६ जून: दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे घरातचं हा सोहाळा साजरा करण्याचं आवाहन खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तसंच नागरिकांना गतवर्षीचाच सोहळा सकाळी ९ वाजता दाखवणार असल्याचं खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना खुप खुप शुभेच्छा..
दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे.६ जून २०२०
छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,
राज्याभिषेक घराघरात! pic.twitter.com/JtdBkQFsG7— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 6, 2020
तर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. त्याचबरोबर राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. “छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली.
राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण केलं.
काय म्हणाले खासदार संभाजी भोसले
तोच जोश, तोच उत्साह, तोच क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून. शिवराज्याभिषेक सोहळ्याची दरवर्षीची रायगडावरील लगबग तुम्ही सर्वजण सकाळी पाहण्यासाठी आतुर असाल म्हणूनच सकाळी ९ वाजता गतवर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे.
मी समजू शकतो मी केलेल्या आवाहनाला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आहे. सध्या दोन दिवस कोकणात चक्री वादळाने थैमान घातले असून रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. मोबाईल टॉवर सुद्धा पडले आहेत. परिसरात रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. पण माझा शब्द आहे ६ जून २०२० शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही घरातुन नक्की पहाल, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
News English Summary: Shivrajyabhishek ceremony is celebrated with great enthusiasm every year at Raigad. However, MP Chhatrapati Sambhaji Bhosale has appealed to celebrate this festival at home due to Corona this year. Therefore, Shivrajyabhishek ceremony will be held in the presence of few people this year. MP Sambhaji Raje Bhosale also said that last year’s ceremony will be shown to the citizens at 9 am.
News English Title: Occasion of shivrajyabhishek ceremony at Raigad News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK