22 January 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

मोठा दिलासा | महाराष्ट्रात रिकव्हरी रेट वाढून ९३.२४ टक्क्यांवर | रुग्णसंख्या पुन्हा घटली

Maharashtra corona pandemic

मुंबई, २८ मे | राज्यात सध्या फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात करोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, राज्यातील मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून ५०० च्या खाली उतरला आहे. आज दिवसभरात राज्यात ४२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर १.६४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा नियंत्रणात कसा आणता येईल आणि मृत्यू टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. आजच्या आकड्यांची भर पडल्यानंतर राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ९३ हजार १९८ इतका झाला आहे.

दरम्यान, राज्याची राजधानी मुंबईमध्ये 45+ वयाच्या 39 लाख 02 हजार 233 लोकांमधून 12.42% लोकांना कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागानुसार 27 मेपर्यंत मुंबईमध्ये 45+ च्या 4 लाख 84 हजार 831 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. या व्यतिरिक्त 1 लाख 27 हजार 829 आरोग्य कर्मचारी आणि 1 लाख 40 हजार 505 फ्रंट लाइन वर्कर्सचेही दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मुंबईची साधारण वार्षिक लोकसंख्या (2021) 1 कोटी 30 लाख 7 हजार 446 इतकी आहे. यापैकी आतापर्यंत केवळ 5.79% म्हणजेच 7 लाख 53 हजार 165 लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या डोससह, मुंबईत एकूण 31 लाख 55 हजार 320 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात 45+ वयाच्या 29 लाख 54 हजार 824 लोक म्हणजेच जवळपास 8% लोकांचे दोन्हीही लसीकरण झाले आहे. तर 45+ च्या 34.36% म्हणजेच 1 कोटी 32 लाख 76 हजार 978 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

 

News English Summary: At present only 2 lakh 89 thousand 088 active patients are undergoing corona treatment in the state. 53 lakh 07 thousand 874 patients have recovered and returned home. During the day on Friday, 31,671 patients were cured and the state’s recovery rate rose slightly to 93.24 per cent.

News English Title: On Friday 31671 patients were cured and the state’s recovery rate rose slightly to 93 24 percent in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x