15 November 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

महाविकास आघाडीत महाजॉब्स योजनेवरून पुन्हा ठिणगी...काँग्रेसकडून प्रश्न

Congress unhappy, MahaVikas Aghadi, Satyajeet Tambe

नवी दिल्ली, १६ जुलै : महाविकासआघाडीत पुन्हा एकदा काँग्रेसने नाराज आहे. काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वीच महाजॉब्स ही योजना सुरु झाली. पण या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. यावरुन काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे.

‘आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना – राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या ट्विटसोबत तांबे यांनी एक फोटो जोडलेला आहे, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे, त्यात कुठेही काँग्रेस मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला नाही, त्यामुळे काँग्रेसचे नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

 

News English Summary: Once again, the Congress is unhappy with the Maha Vikas Aghadi. It is being underlined again and again that the Congress is not important in the government. Mahajobs started this scheme a few days ago.

News English Title: Once again the Congress is unhappy with the Maha Vikas Aghadi Satyajeet Tambe News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x