23 February 2025 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

खेळ खल्लास? अजित पवारांसोबत केवळ १ आमदार; इतर ३ देखील राष्ट्र्वादीत परतले

NCP, Ajit Pawar, Sharad Pawar

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

स्वपक्षाचे १०५ आमदार आणि १५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा अशी आकडेमोड भाजप प्रथमपासून करीत आहे. दुसरीकडे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीने सादर केलेल्या पत्रावर मात्र पक्षाच्या ४१ आमदारांच्या सह्या आहेत. यामुळे १३ आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असतील तर भाजपकडील संख्याबळ १३३पर्यंत पोहोचते. त्यातच छोटे पक्ष आणि अपक्ष अशा उर्वरीत १४ पैकी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. मात्र भाजपचा हा डाव पुरता फासल्यात जमा आहे. शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भाजपशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. कारण आता इतर छोट्या पक्षातील आमदार आणि अपक्ष आमदार देखील फुटले तर भाजपाची पंचायत होण्याची शक्यता अधिक आहे. कारण, राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील भाजपच्या गोटातील आमदारांना स्वतःकडे खेचत असल्याचं वृत्त आहे.

कोणाच्या ध्यानीमनी नसताना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऐतिहासिक युती झाली आणि विशेष म्हणजे शिवसेना एनडीए’मधून देखील बाहेर पडत भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेली असताना पाहून भाजपचे केंद्रीय नैतृत्व देखील विचारात पडलं आहे. यासर्व राजकीय उलथापालत शक्य झाल्या त्या केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच हे सर्वश्रुत आहे.

मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात धक्के बसण्यास सुरुवात होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र त्यानंतर खडबडून जाग आलेल्या भाजप नैतृत्वाने पवारांच्या प्रतिमेचा वापर करून महाविकासआघाडीत फूट पडण्याची योजना आखली आणि त्यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबीयांनाच स्वतःकडे ओढत यामागे शरद पवारच आहेत, असा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पवारांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेऊन सर्व विषयांना खोडून काढत, आमदारांशी पुन्हा संपर्क करून भाजपाचा डाव मोडून काढण्यास सुरुवात केली.

राजकीय डावपेचात निष्णात असलेल्या शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाचा हा डाव त्यांच्यावरच उलटवण्याची तयारी केली आहे. शनिवारी दिवसभर त्यांनी विधिज्ञांशी सल्लामसलत केली. विधिमंडळ गट नेता बदलण्याचा ठराव देखील त्यांच्या सल्ल्यानुसार तयार केला. उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सकृतदर्शनी ही लढाई सगळ्यांसाठी अजित पवार विरुध्द शरद पवार अशी दिसत असली तरीही त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे राजकारण आहे.

जर सरकारवरील विश्वास ठराव मंजूर झाला तर आपोआप शरद पवार यांचे राजकारण मर्यादित होईल. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार यावे म्हणूनच अजित पवार यांना भारतीय जनता पक्षामध्ये पाठवले, हा तर त्यांचा स्वभावच आहे, असे वातावरण तयार करुन शरद पवार यांच्या जुन्या प्रतीमेचा वापर करत देशभरात त्यांना टीकेचे लक्ष्य करायचे आणि जर विश्वास ठराव नामंजूर झाला तर अजित पवार यांच्यामुळेच ते झाले. त्यांच्यामागे कोणी नव्हते असे म्हणत सगळे खापर त्यांच्यावर फोडून मोकळे व्हायचे, असाही भारतीय जनता पक्षाचा यामागे डाव आहे. शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भाजपशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे विश्वासू अहमद पटेल यांनी स्वतः केवळ आमदार नव्हे तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन करत आत्मविश्वास दिला असून आता दोन करण्यास सज्ज राहा असा संदेश देत, भारतीय जनता पक्ष यापुढे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही ठरला जाईल असं म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x