5 November 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

वृत्त वाहिन्यांवरील ओपिनियन पोल विरुद्ध मतदाराचा रोष का वाढतो आहे? सविस्तर

Opinion Poll, Exit Poll, Social Media

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी कोब्रा पोस्टने ‘ऑपरेशन १३६’ राबवून अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची ऑन रेकॉर्ड पोलोखोल केल्याचं प्रकरण जास्त जुनं नाही. प्रख्यात वृत्तवाहिन्या देखील कसे भरमसाठ पैसे घेऊन सत्ताधाऱ्यांसाठी पोषक आणि विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी निरनिराळ्या विषयातून अभियानं राबवतात ते उघड केलं होतं. दरम्यान, मागील काही वर्षांपासून ओपिनियन पोलने देखील लोकशाहीला घातक असा प्रकार सुरु केला आहे.

सामान्य लोकांचे विषय आणि सरकार तसेच विरोधक कुठे चुकत आहेत, यापेक्षा कोणत्याही अर्थहीन विषयांवर चर्चा सत्र घडवून आणली जातात. त्यात निवडणुकीच्या काळात मुख्य आणि सामान्यांशी संबंधित असलेले रोजगार, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार अशा गंभीर विषयांना पद्धतशीरपणे लोकांच्या नजरेसमोरून दूर ठेवलं जात. याबाबतीत सर्व यंत्रणा शिस्तबद्ध काम करत असते आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाते.

शेअर बाजारात एखाद्याने इंट्रा डे व्यवहार करून झटपट पैसा कमवावा तसे काही वृत्त वाहिन्या निवडणुकीचा काळ म्हणजे ‘नफ्याचे इंट्रा डे व्यवहार’ असंच समजत असाव्यात. मात्र आपण देशाच्या पुढच्या पिढीला काय देत आहोत याचं त्यांना जराही गांभीर्य दिसत नाही. उलटपक्षी एखाद्याने त्यांना याची आठवण लाईव्ह डिबेटमध्ये करून दिली तर संपूर्ण वृत्त वाहिनी त्याला लक्ष करते हे देखील अनेकदा पाहायला मिळत आहे.

अशा प्रकारच्या ओपिनियन पोलमुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावते आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते आणि त्यामुळे निवडणुकी दरम्यान विरोधक पैसे खर्च करण्यास देखील धजावतात. कारण याच पोलमुळे त्यांच्या मनात आपण पराभूत होणार आहोत अशी मानसिकता तयार केली जाते. आधीच ईव्हीएम’वरून संशय कल्लोळ असताना, २०१४ पूर्वी स्वतःच्या मतदारसंघात स्वतःच निवडून येतील का हे खात्रीलायक न सांगू शकणारे भाजपचे राज्यातील सध्याचे अनेक वरिष्ठ नेते २०१४ नंतर २५० मतदारसंघाचे निकाल काय लागणार हे छाती ठोक सांगून विरोधकांच्या मनात अजून संशय निर्माण करतात.

कालचे काही वृत्त वाहिन्यांचे ओपिनियन पोल तसंच काहीस सांगत होते. सत्ताधारी पुन्हा बहुमताने निवडून येणार आणि विरोधकांचा पुन्हा सुपडा साफ होणार. मतदान प्रक्रियेत मतदार राजा स्वतःशी निगडित विषय लक्षात घेऊन मतदान करतो, मग त्यात महागाई, रोजगार, बेरोजगारी, महिलांसंबंधित विषय तसेच शेतकरी वर्गाच्या समस्या असे विषय येतात. मात्र पोलमध्ये यासर्व विषयांना बगल दिली जाते आणि सद्याच्या वाढत्या बेरोजगारीवर, महागाईवर आणि वाढलेल्या शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार यावर मतदार प्रचंड खुश असून तो आता सत्ताधाऱ्यांना भरभरून मतदान करून पुन्हा सत्तेत बसवणार आहे असं समजण्यापलीकडे दुसरा पर्याय मतदारकडे नसतो.

भाजपचे ‘फर्स्ट टाइम वोटर्स’ हे मोठ्या संख्येने समाज माध्यमांवर असून, त्यात सामान्य लोकं देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र असे पोल प्रसिद्ध होताच नेटकऱ्यांच्या एकूण संतापजनक प्रतिक्रिया पाहता ती आकडेवारी किती फसवी आहे त्याचा प्रत्यय येतो. बेरोजगार होणारा तरुण वर्ग, बंद पडत चाललेल्या कंपन्या, बेकार अवस्थेत असलेला कामगार वर्ग, महागाईने त्रस्त झालेली गृहिणी आणि तिचं कुटुंब, महिला प्रश्नावरून संतप्त महिला वर्ग, जातीय विषयांमुळे कंटाळलेला अल्पसंख्यांक समाज, शेतकरी वर्ग ते बंद पडत चालेले सरकारी उपक्रम असं सर्वच विरोधात असताना या पोलमध्ये एकतर्फी निकाल येतात तरी कसे, यावर सध्या समाज माध्यमांवर चर्चा रंगल्या आहेत. प्रसार माध्यमचं सरकार स्थापनेत गुंतल्याने लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात आहे आणि याचे गंभीर परिणाम देश भविष्यात भोगेल, मात्र त्या परिणामांची झळ प्रसार माध्यमांमधील चुकीच्या लोकांच्या पुढील पिढीला देखील भोगावी लागणार आहे याचा जरी त्यांना साक्षात्कार झाला तरी देश वाचला असंच म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x