राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणणारे फडणवीस भाजपची संस्कृती घेऊन दिल्लीला
मुंबई, २३ मार्च: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या सर्व प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई पोलीस दलात बदल्यांचं रॅकेट उघडकीस येऊन त्याचे सर्व पुरावे गुप्तचर विभागानं सादर करुनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन आज दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
“पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक बडे अधिकारी आणि काही राजकारण्यांचीही नावं आहेत. त्यामुळे या चौकशी अहवालातील तब्बल ६ जीबीचे कॉल रेकॉर्ड्स पुरावे म्हणून सादरही करण्यात आले होते. पण ते अतिशय संवेदनशील असल्यानं सार्वजनिक करणं योग्य होणार नाही. या संदर्भात मी आता केंद्रीय गृहसचिवांची भेटीची वेळ मागितली आहे आणि त्यानुसार आज दिल्लीत मी त्यांना भेटून हे सर्व पुरावे त्यांच्यासमोर सादर करणार आहे”, असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गृहसचिवांकडे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपाचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार खंडन केलं होतं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर २०२० च्या सुरुवातीलाच हा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी आरोपांवर उत्तर देणारे फडणवीस आता इस्राईल नव्हे तर दिल्लीला जाणार आहेत.
Maharashtra Former CM&BJP leader Devendra Fadnavis: Phone tapping of opposition leaders is not a tradition of Maharashtra. Our govt never gave such an order. Present state govt is free to do any probe by any agency. Even Shiv Sena leaders were a part of State Home Ministry then. pic.twitter.com/tPpkWIXTMf
— ANI (@ANI) January 24, 2020
मागील फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. गृह खात्यानं सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचं ठरविलं होते. या संपूर्ण प्रकरणावरून सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी भाजपला धारेवर धरलं होतं. फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी त्यावेळी केला होता. तर, फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. ‘आमच्या सरकारनं तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. जे आरोप करताहेत, त्यांची विश्वासार्हता किती आहे हे त्यांनाही माहीत आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही आपली संस्कृती नाही. तरीही सरकारला चौकशी करायची असेल तर ती तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा. महाराष्ट्राच्या जनतेला सत्य माहीत आहे. आमच्या सरकारमध्ये गृहराज्य मंत्री खुद्द शिवसेनेचेच होते,’ असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.
फोन टॅपिंगसाठी आणि व्हॉट्सअॅप मेसेज अनधिकृतरित्या पाहण्यासाठी इस्रायली कंपनीकडून ‘पेगॅसस’ ही प्रणाली विकत घेण्यात आली होती. त्यासाठी काही अधिकारी इस्रायलला गेल्याचा आरोप होता. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘इस्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर सरकारनं करावी,’ असं ते म्हणाले.
News English Summary: The letter bomb dropped by former Mumbai Police Commissioner Parambir Singh caused a stir in state politics. Home Minister Anil Deshmukh is facing a number of charges in connection with the case. BJP leaders have demanded the resignation of Deshmukh. Sharad Pawar has given a clean chit to Anil Deshmukh at a press conference in Delhi. Against this backdrop, Leader of Opposition Devendra Fadnavis held a press conference.
News English Title: Opposition Devendra Fadnavis held a press conference over phone tapping of MahaVikas Aghadi govt news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER