22 December 2024 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

राज्यात भाजपचा सर्वच निवडणुकांमध्ये पराभव | तरी फडणवीस म्हणाले 'हे जनतेच्या मनातलं सरकार नाही'

Opposition leader Devendra Fadnavis, Anil Deshmukh

मुंबई, ५ एप्रिल: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चुप्पीवरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राजीनामा झाला असला तरी, सरकारवर गंभीर आरोप लागले तरी, राज्याचे मुख्यमंत्री यावर चकार शब्दही का बोलत नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. तसेच, जनतेच्या मनातलं सरकार म्हणाऱ्यांना हे सरकार जनतेच्या मनातलं नसल्याचं सिद्ध झालंय, असेही त्यांनी म्हटले. फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असलं तरी मागील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आणि इतर निवडणुका पाहता भाजप लोकांच्या मनातील पक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतलीय. पत्रकार परिषदेतून त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. इतक्या भयावह घटना महाराष्ट्रात झाल्या, कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत लागले. पण राज्याचे मुख्यमंत्री यासंदर्भात चकार शब्दही का बोलत नाहीत. अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं आहे. किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया वाझे काय लादेन आहे का, अशी होती, या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या. तो लादेन की दाऊद आहे मला माहीत नाही. पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतरही मुख्यमंत्री का बोलत नाही, असा माझा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी चूक झाली, तर आम्ही तू सुधारू, असं जनतेला सांगितलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis after resignation of Home Minister Anil Deshmukh. At this time, he also targeted Chief Minister Uddhav Thackeray for his silence. Devendra Fadnavis questioned why the Chief Minister of the state did not utter a word even though he had resigned and faced serious allegations against the government.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis after resignation of Home Minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x