23 December 2024 1:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

इथे कोरोना म्हणता | आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू असतात - फडणवीस

Opposition leader Devendra Fadnavis, Pooja Chavan, minster Sanjay Rathod

मुंबई, २५ फेब्रुवारी: सध्या राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे अधिवेशन होणार का नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे,’ असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, ‘हे सरकार कोरोनाच्या नावाखाली विरोधक आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथे कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू असतात, तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का?’ असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचे प्रकरण असो, विरोधी पक्ष नेहमी आक्रमक राहील. अशा प्रकरणात उघडे पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला काहीच देणेघेणे नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणे म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही’, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

 

News English Summary: Currently, Corona is back in the state. The number of corona patients is increasing rapidly in many places. This raises the question of why the convention will not take place. Meanwhile, Leader of the Opposition Devendra Fadnavis has strongly attacked the government over this. Devendra Fadnavis has made a serious allegation that the government is running away from the convention, that is, from the opposition and the people.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis has strongly attacked the government over this minster Sanjay Rathod issue news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x