27 December 2024 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

बदल्या करणं हा एकमेव धंदा राज्य सरकार करतंय | फडणवीसांचा आरोप

Opposition leader Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray, MahaVikas Aghadi

मुंबई, २ सप्टेंबर : राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अजून नियंत्रणात आलेलं नाही. दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोना रुग्णांची वाढीचं प्रमाण कमी झालं आहे. राज्यात होणारी वाढ कायम असताना तुलनेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबईतील चाचण्या वाढवा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या 6574 होती, ती 7709 वर गेली. ही वाढ केवळ 14 टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत 37,528 इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन 64,801 इतकी झाली. ही वाढ 42 टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात 18.44 टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

“बदल्या दरवर्षी होत असतात पण आमच्या काळात करोना नव्हता. जर आमच्या काळात करोना असता आणि बदल्या झाल्या असत्या तर बोट दाखवता आलं असतं. बदल्यांचा भत्ता देण्यासाठी ५०० कोटी लागतात. येथे पगार देण्यासाठी पैसे नाही आणि मग बदल्या कशाला सुरु आहेत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“नागपुरात आता करोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. आता हळूहळू मृत्यूदेखील वाढत असून चिंताजनक आहे. त्यामुळे नागपुरला आयसोलेशन धोरण आखण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन आयसोलेशन करण्याची गरज आहे. यामुले मृ्त्यू संख्येवर नियंत्रण आणता येईल. गेल्या दौऱ्यात मी अधिकाऱ्यांसी यासंबंधी चर्चा केली होती. आता हे धोरण आक्रमकपणे राबवण्याची गरज आहे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, “गंभीर परिस्थिती असून मीदेखील त्याची माहिती घेतली. तरुण पत्रकाराचा अशा पद्दतीने मृत्यू होणं अंतर्मुख करणारं आहे. याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे”.

 

News English Summary: In Mumbai, only 14 per cent more tests were conducted in August than in July. The same number is 42 per cent in the case of the state. Opposition leader Devendra Fadnavis has demanded that the number of tests in Mumbai be increased immediately.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis On Maharashtra CM Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x