15 November 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसताना मंत्र्यांसाठी गाड्या प्राथमिकता आहे का? - फडणवीस

Opposition leader Devendra Fadnavis , Covid 19, Corona Virus

मुंबई, 4 जुलै: मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आयसीयूचे बेड आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. शासनाने जी खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे ती वेगवान नाही. ती प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे असाही सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

मंत्र्यांच्या गाडी खर्चाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आता गाडी ही काय प्राथमिकता असू शकत नाही. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत कडक धोरण स्वीकारले पाहिजे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवातून काही सूचना करत असतील. आम्हालाही ते सूचना करायचे. मुख्यमंत्र्यांनी आता ठरवायचे आहे की सूचनांची अमलबजावणी कशी करायची आहे, असं फडणवीस म्हणाले .

भाजप कार्यकारिणीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. कार्यकारणीत प्रत्येकाला न्याय देण्याच्या प्रयत्न केला आहे. ज्या पद्धतीची कार्यकारणी असते तशीच तयार केली आहे. काहींना केंद्रांत संधी द्यायची आहे, त्यातलं एक नाव आपल्यासमोर आहे, असं ते म्हणाले.

 

News English Summary: Talking about the cost of the minister’s car, Devendra Fadnavis said that now the car cannot be a priority. There is no money to pay the salaries of the employees. He said that the Chief Minister and Deputy Chief Minister should adopt a strict policy in this regard.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis said that now the car cannot be a priority in this situation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x