24 November 2024 6:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

फडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा; महसूलमंत्री थोरात यांचा सणसणीत टोला

revenue Minister Balasaheb Thorat, Devendra Fadnavis

नगर: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी युतीच्या कमीत कमी २२० जागा निवडून येणार आणि त्यानंतर विरोधीपक्ष नेता करता येईल एवढ्या जागा देखील विरोधकांना मिळणार नसल्याचा छातीठोक दावा केला होता.

त्यानंतर देखील महाराष्ट्रातील ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने करण्यात येत आहेत. त्याच मुद्यावरून राज्याचे महसूलमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचऱ्या शब्दात निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचे सर्वचं अंदाज चुकत असल्याने त्यांनी चांगला प्रथम ज्योतिषी शोधावा असा खोचक टोला थोरात यांनी फडणवीसांना लगावला आहे आहे.

आता त्यांच्यावर सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यामधील वाद सर्व महाराष्ट्र पाहत असून भाजपची आता अधोगती सुरू झाली असल्याचेही त्यांनी म्हटले. माझ्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. त्याशिवाय काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदही माझ्याकडे. सगळी पदे मलाच मिळाली पाहिजे अशी माझी भूमिका नाही. त्यामुळे आपल्याला पालकमंत्री पद नको असेही थोरात यांनी स्पष्ट केले. याआधी विविध जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे नगरचे पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची बातमी चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title:  Opposition Leader Devendra Fadnavis should search better astrologer for prediction said revenue Minister Balasaheb Thorat.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x