22 January 2025 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

आ. राणाजगजीत सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ती अफवा; नेमका विषय आला समोर: सविस्तर

NCP MLA Ranajagjitsinha Patil, Former MP Padmasinha Patil, NCP, Sharad Pawar, Pawanraje Nimbalkar, Omraje Nimbalkar

उस्मानाबाद : देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.

नेत्यांची पक्षांतर करण्याची अनेक कारणे आहेत. काही नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अनेक नेत्यांना आपल्या शिक्षणसंस्था, सुतगिरण्या, कारखाने यांचा वाढलेला व्याप सुरक्षित ठेवायचा आहे. त्यासाठी घेतलेले कोट्यवधीचं कर्ज कारणीभूत ठरत आहे. सत्ता नसल्यामुळे बँका घरापर्यंत येत आहेत. परंतु, सत्ताधारी पक्षासोबत असल्यास ही वेळ येणार नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे पक्षांतरवर नेत्यांचा भर वाढला आहे.

जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरु केले आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. मात्र या मुलाखतीसाठी माढा मतदारसंघाचे आ. बबन शिंदे आणि बार्शीचे आ. दिलीप सोपल हे अनुउपस्थित आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं चर्चेने जोर पकडला आहे.

पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. यामध्ये बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहूल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मन ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावीत, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, पांडुरंग बरोरा या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी देखील मोठी झाली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

मात्र त्यावर राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी पूर्ण स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की ‘पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये’ असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान ‘काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रात माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे मला माझ्या कार्यकर्त्यांकडून समजले. पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही व याबाबत पक्ष कार्यकर्ते अथवा कोणत्याही नेत्यांशी माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

वास्तविक मे महिन्यातच आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी भूम, वाशी, उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत आणि पीक विमा योजने संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेत होती आणि त्यानंतर उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना रु.५६.६१ कोटी चा विमा देण्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानंतर या दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी गावोगावी उत्स्फुर्तपणे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठीचे बॅनर लावले आणि त्यानंतर सर्व संभ्रम पसरवून मिळालेल्या फायद्यावरून लोकांना विचलित करण्यासाठी अफवा पसरवल्या गेल्या असं त्यांनी म्हटलं आहे.

राणाजगजीत सिंह पाटील यांचं संपूर्ण स्पष्टीकरण:
“उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना रु.५६.६१ कोटी चा विमा देण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानंतर या दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी बांधवांनी गावोगावी उत्स्फुर्तपणे माझे आभार व्यक्त करण्यासाठीचे बॅनर लावले. राजकारणापलीकडे याचे पूर्ण श्रेय शेतकरी मला देत असल्याने, विरोधकांचा तिळतपाट झाला असून, सामान्य जनतेचे यापासून लक्ष विचलित करण्यासाठी तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत. उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील पिक विम्याचा प्रश्न, रखडलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव औद्योगिक वसाहती मधील सौर ऊर्जा प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या व जिल्ह्यातील इतर अनेक महत्त्वाच्या विषयावर मी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना अनेक वेळा भेटलो आहे. या भेटींचा मुद्दामहून विपर्यास करण्यात येत आहे.

माझ्या पूर्व नियोजित‍ कार्यक्रमानुसार मी सध्या राज्याबाहेर पत्नीच्या निसर्गोपचार, उपचारासाठी आलो आहे. काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रात माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे,मला माझ्या कार्यकर्त्यांकडून समजले. पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही व याबाबत पक्ष कार्यकर्ते अथवा कोणत्याही नेत्यांशी माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवं मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा कार्यक्रम उस्मानाबाद व कळंब शहरामध्ये दि.२८ व २९ जुलै रोजी राबविण्यात येत आहे, या मध्ये देखील युवकांनी सहभागी होऊन नावे नोंदवावीत असे आवाहन करत आहे”.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x