महत्वाच्या बातम्या
-
तो निर्णय चुकीचा होता, पाठीत खंजीर खुपसला गेला | सकाळच्या शपथविधीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
लोकसत्ता’तर्फे आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर अजित पवार यांच्यासोबत भल्या सकाळी घेतलेला शपथविधी अजूनही चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ८० दिवसांच्या चाललेल्या सरकारची चर्चा अजून देखील होत असते. त्यावर फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर खुद्द भाजपामधून देखील चर्चा किंवा नाराजी किंवा पाठिंबा अशा संमिश्र भूमिका व्यक्त होत असतात.
4 वर्षांपूर्वी -
BMC निवडणूक | श्रेत्रीय अस्मितेसंदर्भातील मनसेसोबत मतं जुळत नसल्याने युती करण्याचा प्रश्नच नाही - फडणवीस
लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत आज देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी महाराष्ट्रामधील आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनात पार्टी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का या प्रश्नावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर | आता पुनर्विचार याचिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अलाहाबाद हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची समिती स्थापन केली होती. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी या समितीने काम केलं. त्यानुसार या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन गोंधळ | वडेट्टीवार यांचीही बाजू सावरत अजितदादा म्हणाले, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचीही बाजू सावरून घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू | ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही - संभाजीराजे
संभाजीराजे भोसले यांनाही या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही संभाजीराजेंवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर संभाजीराजेंनी जोरदार इशारा देणारं ट्वीट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | बदलापुरात वायुगळती | नागरिकांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास
एमआयडीसी भागात वायुगळती झाल्याने शिरगाव आपटेवाडी या परिसरात ३ किमीच्या परिघात लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. वायुगळतीमुळे काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास देखील जाणवू लागला. मात्र ही वायुगळती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. ही घटना सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत | नवे नियम अजून विचाराधीन | आपत्कालीन गोंधळ
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असल्यामुळे राज्यात अनलॉकिंगच्या दिशेनं एक-एक पाऊल टाकण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांची विभागणी 5 लेव्हलमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, असंही वडेट्टीवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश | विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेनं नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! राणेंचा संभाजीराजेंवर प्रहार | पण कोणाच्या सांगण्यावर?
संभाजीराजे छत्रपती हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाची आक्रमकता देखील वाढत चालली आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलो म्हणजे आरक्षणही मिळत नाही आणि कोणी पुढरीही होत नाही. समाजाला वाटलं पाहिजे ते राजे आहेत. लोकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी तसं कार्य करावं लागतं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | कोंकण रेल्वेमध्ये भरती | ईमेलद्वारे अर्ज करा
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भर्ती 2021. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 12 विभाग व्यवस्थापक, अधिकारी आणि लेखा सहाय्यक पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार केआरसीएल भरतीसाठी 01 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे अर्ज सबमिट करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील HSC परीक्षा रद्द | आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या बैठकीत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर
राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र, १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, १२ वीची परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल - नाना पटोले
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यमांशी बोलताना नानांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
माझ्यासाठी आपल्या सर्वांचा जीव महत्वाचा | शिवराज्याभिषेक सोहळा घरूनच साजरा करा, संभाजीराजेंचे आवाहन
यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले आहे. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक 5 व 6 जूनला थाटामाटात साजरा होत असतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकार ने केवळ 20 लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. यंदा सुद्धा “शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात” साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल असे त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेतून मिळवा अनुदान
शेतकरी मित्रांसाठी, केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहीना काही योजना राबवित असते, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ व्हावी, शेतीचा महत्त्वाचा आधार म्हणजे ‘पाणीसाठा’ होय. त्याकरता सरकारने नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्त करणे या करता तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवणे झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लेकीला जमलं नाही ते पुतण्याने करून दाखवलं | ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे मंजूर
सामाजिक न्याय विभागांतर्गत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नगर | राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या भाजप कार्यालय भेटींमुळे भाजपमध्ये चिंता
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रीचे आमदार संग्राम जगताप यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बोलावण्याच्या मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. अहमदनगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार जगतापांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी देखील त्यामुळे या भेटीची दखल घेऊन शहरातील पक्षाच्या आणि महानगपालिकेतील पदाधिकार्यांना त्याचा जाब विचारल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी -
अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर राज्य सरकारनं त्यांना आश्वस्थ करावं - मुंबई हायकोर्ट
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला कोरोनामुक्तिसाठी देशाला लस उपलब्ध करुन देत देशाची एकप्रकारे सेवाच करत आहेत. जर त्यांना कोणत्याही प्रकारे देशात सुरक्षित वाटत नसल्याची भावना निर्माण झाली असेल तर राज्य सरकारनं त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आश्वस्थ करावं, अशा स्पष्ट सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिल्या आहेत. राज्य सरकारमधील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी पुनावाला यांच्या वैयक्तिक पातळीवर संपर्क साधावा आणि त्यांना सुरक्षेचं आश्वासन द्यावं, असं कोर्टानं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींनी CBSE च्या परीक्षा रद्द केल्या, यावर आशिष शेलार यांचे मत काय? - सचिन सावंत
मागील काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
काल फडणवीस नाथाभाऊंच्या घरी गेले होते, आज नाथाभाऊ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले
एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today