महत्वाच्या बातम्या
-
तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं असून संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.
4 वर्षांपूर्वी -
एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे पाहून मला खूप बरे वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ही आपल्याकडची परंपरा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घरी येऊन गेले - रक्षा खडसे
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गेले अनेक दिली दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही दिवस ते दौरे करत आहेत. अशात त्यांनी थेट जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने लोकांच्या भुवय्या उंचावल्या. भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी फडणवीस गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खडसेंनी भाजप सोडतानाही फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते.
4 वर्षांपूर्वी -
२००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भातखळकरांनी मनसेकडे तिकीट मागितलं होतं - राज ठाकरे
राज्याच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत राज ठाकरे यांनी त्यांचे विचार सविस्तर मांडले. यावेळी त्यांनी देशातील कोरोना स्थितीवरून देखील सविस्तर भाष्य करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. तसेच राज ठाकरे यांनी दलबदलू राजकीय नेत्यांवर देखील भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
IMC'ने दुसरी लाटेची कल्पना दिली होती तरी आपले राजकारणी निवडणुका, कुंभमेळ्यात गुंतले - राज ठाकरे
राज्याच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत राज ठाकरे यांनी त्यांचे विचार सविस्तर मांडले. यावेळी त्यांनी देशातील कोरोना स्थितीवरून देखील सविस्तर भाष्य करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
मुक्ताईनगनरमध्ये भाजपाला कार्यालयही शिल्लक नाही? | फडणवीसांवर नाथाभाऊंच्या घरीच बैठकीची वेळ
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या दौऱ्यावर आहेत. वादळाने ज्या भागाला तडाखा बसला त्या भागाची पाहणी देवेंद्र फडणवीस करत आहेत. दरम्यान, काल (३१ मे) देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज थेट ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या | कोर्टाकडूनच ओबीसींच्या संख्येची विचारणा - भुजबळ
दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावरून महत्वाचा निर्णय दिला. त्यावरून भाजप नेत्यांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरवात केल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या दाव्यात काही तथ्य नाही.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमुक्त मुक्ताईनगर | नाथाभाऊंच्या दणक्यामुळे फडणवीसांवर पक्ष बांधणीची वेळ
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव मुक्ताईनगराच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीसांनी येथे पाहणी दौरा असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी मुख्य कारण हे एकनाथ खडसे यांनी भाजपमुक्त केलेल्या मुक्ताईनगरची चिंता भाजपाला सतावत असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं | संभाजीराजेंनी सुद्धा मान्य करत म्हटलं 'माझं समाधान झालंय'
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट केलंय. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला होता. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याबाबत संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली होती.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही पंतप्रधानांना भेटा आणि तौक्ते चक्रीवादळासाठी महाराष्ट्राला योग्य ती मदत द्या असे सांगा - उपमुख्यमंत्री
मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे सोमवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर काही प्रस्ताव मांडले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली. त्यामुळे मी रामदास आठवले यांना तौक्ते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी विनंती करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण - राज्य सरकारचा मोठा निर्णय
मराठा समाजातील लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% EWC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य सरकरने जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून आणि RBI कडून पैसे मिळत नाहीत | रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 31 मे 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राणे स्वतः पत्रकारितेत | तरी लिखाणावरून लोकपत्र वृत्तपत्राच्या कार्यालयावर समर्थकांचा हल्ला
नारायण राणे स्वतः पत्रकारितेत असून प्रहार नावाचं वृत्तपत्रं चालवतात. मात्र आज घडलेल्या धक्कादायक प्रकारातून त्यांनी स्वतःच पत्रकारितेची मूल्य आणि स्वातंत्र्य बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळालं. कारण लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग आणि सचिन वाझेच वसुली गॅंग चालवत होते का? | प्रसिद्ध कार डिझायनर छाबरियांचाही आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा दावाही छाबरिया यांनी केला आहे. चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात संभाजीराजे आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेऊन राज्यभर दौरा करत असलेले कोल्हापूर राजघराण्याचे वारसदार संभाजीराजे भोसले नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरातील राजकीय समीकरणे पाहता ते आगामी लोकसभा लढवतील, तीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद््द्यावर संभाजीराजे सध्या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. त्यांनी शरद पवार ते राज ठाकरे अशा सर्व राजकीय पक्षप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत भाजपाला धक्का | कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांचा मनसेत प्रवेश
भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी मागील काही काळापासून पक्षाला राम राम ठोकून इतर पक्षात प्रवेशाचा सपाटा लावल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये भाजपाला सर्वाधिक राजकीय धक्के हे शिवसेना राष्ट्रवादीने दिल्याचं पाहायला मिळतंय. आता त्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भर टाकून भाजपाची चिंता वाढवली आहे. आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
आर्थिक अधोगती, जगात नाचक्की, द्वेष, महागाई आणि बेरोजगारी | मोदी सगळ्यात अपयशी व नापास नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रामध्ये सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदींची स्तुती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
संभाजी छत्रपतींची सरकारला सहकार्य करण्याची कृती मान्य नाही - चंद्रकांत पाटलांचा इशारा
मराठा आरक्षणाच्या विषयावरून संभाजीराजे छत्रपती राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी जवळपास सर्वच राजकीय पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन समर्थनासाठी विनंती केली आहे. त्यांच्या भेटीगाठीवरून सर्वच पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतलेली असताना भारतीय जनता पक्षाच्या पोटात दुखू लागल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दारूबंदी तो बहाणा है, 'मालपाणी निशाना है | रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर महाराष्ट्र भाजपमुक्तीकडे? | जळगाव भाजपच्या ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाला गळती सुरुच असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आणखी ३ नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जळगाव भारतीय जनता पक्षाच्या 3 नगरसेवकांचा मुंबईत पक्षप्रवेश केला. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील दहा आजी माजी नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश ताजा असतानाच आठवड्याभरातच भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC