महत्वाच्या बातम्या
-
हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, मी विरोधी पक्षाप्रमाणे नव्हे जबाबदारीने बोलणार - मुख्यमंत्री
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज (२१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांचं पत्रं आणि केंद्रीय मंत्र्यांना फोन | खतांच्या किमती कमी झाल्या | शेतकऱ्यांना पावरफूल दिलासा
देशामध्ये रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्याने मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. खतांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहीले होते. पवारांना केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन पवारांना दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचे वादळी दौरे | 4 ठिकाणी १२- १५ मिनिटांच्या बैठका | केंद्राच्या आयुष्मान आरोग्य केंद्राचे पत्रे उडाल्याचे पाहिले अन...
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता राजकीय दौरे सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात आघाडी घेतली असून सरकार विचारात असतानाच त्यांनी बुधवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. अलिबागसह ६० किलोमीटर अंतरातील ३ गावांत अवघ्या अडीच तासात त्यांनी चार ठिकाणी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी फार तर ८ ते १३ मिनिटे वेळ दिला. यामुळे फडणवीस यांचा दौरा “चक्रीवादळ पर्यटन’ ठरले आहे. विरोधी पक्षनेता येणार म्हणून चारही ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.
4 वर्षांपूर्वी -
मी भाजपचा ठेका घेतलेला नाही | भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, तोडगा सांगावा - संभीजीराजे संतापले
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. परंतु, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरून संभाजीराजे गरजले | पंतप्रधान मोदींना चारवेळा पत्र दिले | अद्याप भेट दिली नाही
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. परंतु, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
नैसर्गिक आपत्तीतही पंतप्रधांना केवळ गुजरातच दिसतोय, ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत असंच दिसतंय
अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्युकरमायकोसिस | म. फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार | आरोग्यमंत्र्यांची माहिती
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला असून रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र 34व्या क्रमांकावर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के इतके आहे ही राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याच दरम्यान राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, या सर्व रुग्णांवर उपयार सुरू आहेत आणि मोफत उपचार देण्याच्या संदर्भातही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
तौते चक्रीवादळ | गुजरातसाठी पंतप्रधानांची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा | महाराष्ट्रासाठी फक्त मन की बात?
अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Good News | BMC'च्या ग्लोबल टेंडरवला ३ पुरवठादारांकडून प्रतिसाद | स्पुतनिक लस उपलब्ध करण्यास तयार
राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
संदीप देशपांडे यांची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर बोचरी टीका... काय म्हणाले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे कायम ठाकरे सरकारवर टीका करत असतातच. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही काम टीका करताना संदीप देशपांडे दिसतात. आता पुन्हा एकदा देशपांडेंनी राऊतांवर टीका केली आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज (१९ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने कुठे तरी एक पाऊल मागे घेतले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू | भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा, काँग्रेसचा गौप्यस्फोट
देशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे.मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींच्या कामाचं मात्र कौतुक होतय.त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना पंतप्रधान करायची चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये चालु आहे असा गौप्यस्फोट केला आहे. ‘देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जंगलातील वाघीण शिकार करते, सर्कस'मधील वाघीण केवळ मनोरंजन करते - रुपाली चाकणकर
राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या मध्ये पुन्हा एकदा ट्विट वॉर सूरु झाले आहे. राजकीय शेरेबाजीमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपण टीकाकारांची फारशी पर्वा करत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही एक खोचक ट्विट करून अमृता फडणवीस यांना टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
तौक्ते वादळ | कोकणच्या संबंधित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला
मागील तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील.
4 वर्षांपूर्वी -
तौक्ते वादळ | मोदींचा केवळ गुजरात नुकसानीचा पाहणी दौरा | महाराष्ट्रातून टीका टाळण्यासाठी फडणवीसांचा कोकण दौरा?
तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यानंतर किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार सुरू झाले. सुमारे अडीच ते तीन तास जमीन धसण्याचे प्रकार सुरू होते. वादळामुळे सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागोजागी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने आज मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू झाली आहे. तर, मराठा आरक्षणावर पुढील दिशा ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने देखील महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बापरे! | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार?, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'...
कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापायला लागले असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणासाठी सामोपचाराची का सरकारविरुद्ध एल्गार करण्याची भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध
केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB