महत्वाच्या बातम्या
-
तौते चक्रीवादळ | मुंबईकरांनो वादळ-वारे मुंबईच्या उंबरठ्यावर | पुण्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार
अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या आंदोलनात भाजपचा सक्रिय पाठिंबा | पक्षीय स्वरूपाने समाजात उभी फूट पडण्याची भीती - सविस्तर वृत्त
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यामध्ये संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबई येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
ताैक्तेे चक्रीवादळाचा धोका | अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
गुजरात आणि महाराष्ट्रासहित पाच राज्यांवर अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘ताैक्तेे’ चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागानुसार हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत १८ मे रोजी गुजरातेतील द्वारका येथे धडकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात आज कोकण, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन | कोरोनाशी झुंज अपयशी
काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी....
कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये सोनिया गांधी यांनी काही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जावी असं मत व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांनी करोनाविरोधातील लढाईत परिणामकारक निकालासाठी लसीला प्राधान्य देण्याच्या धोरणाची गरजही अधोरेखित केली होती.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
4 वर्षांपूर्वी -
ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
देशात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. दुसरीकडे, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली.
4 वर्षांपूर्वी -
Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे
देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली.
4 वर्षांपूर्वी -
ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
दक्षिण अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र कमी दाबाचे बनले असून १६ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून गुजरात-कच्छच्या दिशेने जाईल, असा अंदाज शुक्रवारी आयएमडीने वर्तवला आहे. परिणामी राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर किनारा या भागात १५ मे ते १७ मे या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया
राज्यातील मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून नुकतंच रद्द करण्यात आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 घटनादुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे अंसवैधानिक आहे की नाही याबाबत ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली होती. त्यानुसार राज्यांना आरक्षणाचा अधिकार उरले नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस
देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. गुरुवारी देशभरात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमित आढळले, तर 3 लाख 44 हजार 570 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. 4 दिवसापूर्वी, 10 मे रोजी 3.29 लाख नवीन रुग्ण आढळले होते, तर 3.55 लाख संक्रमित ठीक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच....
राज्यातील मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून नुकतंच रद्द करण्यात आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 घटनादुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे अंसवैधानिक आहे की नाही याबाबत ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली होती. त्यानुसार राज्यांना आरक्षणाचा अधिकार उरले नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
राज्यातील मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून नुकतंच रद्द करण्यात आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 घटनादुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे अंसवैधानिक आहे की नाही याबाबत ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे खळबळजनक आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
#व्यक्त_व्हा | अजित पवारांनी निर्णय रद्द केला तसा धाडसी निर्णय मोदी सेंट्रल विस्टा बाबत घेतील का?
#व्यक्त_व्हा #RaiseYourVoice सामान्य लोकांच्या आणि विरोधकांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियासाठीचा 6 कोटी खर्चाचा निर्णय रद्द केला. आता पंतप्रधान मोदी सामान्य लोकं आणि विरोधकांच्या टीकेला मान देऊन सेंट्रल विस्टा प्रकल्प रद्द करणार का?
4 वर्षांपूर्वी -
महागाईने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला, लोकांना जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलंय - राष्ट्रवादीचं आंदोलन
देशातील 5 राज्यातील निवडणुका संपताच पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोलमध्ये वाढ होऊन तो शंभरीच्या जवळ आला आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंधनाच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. याचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही पडले असून राज्यात सर्वात महाग पेट्रोलची नोंद परभणीत झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयासाठी खर्च आणि यंत्रणा नको | सोशल मीडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा निर्णय रद्द
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१३ मे) दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनला 1 जून पर्यंतची वाढ | राज्य सरकारकडून निर्बंधांची नवीन नियमावली जारी
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, सध्या राज्यात जे निर्बंध घालून देण्यात आले आहेत, ते कायम राहतील. या निर्णयाचे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले असून, आता ब्रेक द चेनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER