महत्वाच्या बातम्या
-
एक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार
काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीतील विकास कामांसाठी निधी मिळाला यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी ‘प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो, तसेच एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या रस्त्याला निधी देतो’असा शब्द त्यांनी दिला होता, तो पूर्ण केला असं स्वतः मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं होतं. यासाठी गडकरींच्या केंद्रीय परिवहन खात्याने तब्बल ४८ कोटी ६१ लाखाचा निधी मंजूर केला होता.
4 वर्षांपूर्वी -
निलेश कसा आहेस…रुग्ण सेवा करतो आहेस पण स्वत:ची काळजी घे, काही लागलं तर फोन कर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत. निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने हे कोविड सेंटर उभारले आहे. आता याची महती संपूर्ण जगभरात पसरताना दिसत असून, जगभरातून मदतीचा हात या कोविड सेंटरसाठी पुढे केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
गोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर
गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी पहाटे २६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी रुग्णालयाला पुरेसा प्राणवायू पुरवठा नव्हता, अशी कबुली राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
मी अन्वय नाईक प्रकरणी कारवाई केली आणि मोहन डेलकर आत्महत्येनंतर SIT नेमली म्हणून....
मला प्रसार माध्यमांच्या माध्यमातुन अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडुन आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. मी गृहमंत्री असतांना मधल्या काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे. पण एक आहे “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही” असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत | ९ देशातून 1 कोटी 20 लाखांची मदत
राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरमधील 100 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. निस्वार्थी भावनेने काम केलं तर हजारो हात देणारी असतात, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं.आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपतींना पत्र, तर पंतप्रधानांची देखील भेट घेणार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती महोदयांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रानेच त्यांचं कौतुक केलंय | उद्धव ठाकरे आता एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत - भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकाबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या कामावर संशय निर्माण केला आहे. मात्र सुप्रीम कोर्ट आणि केंद्राने देखील उद्धव ठाकरे आणि मुंबई महागरपालिकेच्या कामाचं आणि उत्तम नियोजनाचं कौतुक केलं आहे हे वास्तव आहे.
4 वर्षांपूर्वी -
नोटबंदीवेळी नदीत नोट वाहत होत्या तेव्हा मोदींचा जयजयकार | आज नदीत प्रेतं वाहत असताना मोदींना प्रश्न नाही? - काँग्रेस
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, मुख्यमंत्र्यांचं नरेंद्र मोदींना पत्र
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा रोष मराठा समाजाने ठाकरे सरकारवर काढला. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून नव्या प्रयत्न केले जात आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (११ मे) सायंकाळी ५ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. मध्यतंरी झालेल्या वादानंतर ही पहिल्यांदाच ही भेट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता | म्यूकोरमायकोसिसवर 1000 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
राज्यात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 37 हजार 236 नवीन प्रकरणे समोर आली. तर 61 हजार 607 रुगण बरेही झाले. हा आकडा 31 मार्चला आलेल्या 39 हजार 544 च्या जवळपास आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 86.97% झाला आहे. राज्यात आतापर्यंत 44 लाख 59 हजार 425 रुग्ण कोरोना संक्रमणानंतर बरे झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आमदार असते तर एका रात्रीत खरेदी केले असते | ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्सला विकत घ्यायला थोडा वेळ लागतो - आ. भाई जगताप
कोरोना व्यवस्थापनातील त्रुटींमुळे आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निशाण्यावर असणाऱ्या केंद्र सरकारने आता सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे राष्ट्रीय आराखडा मागवला होता, परंतु केंद्राने एक हट्टी पवित्रा घेत सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. साथीच्या आजाराशी संबंधित धोरणांबाबत कोर्टाच्या प्रश्नांवर रविवारी केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र (प्रतिज्ञापत्राचा) तपशील सोमवारी उघडकीस आला.
4 वर्षांपूर्वी -
पैसे दिल्याचं आरोपकर्ते परमबीर सिंग आणि सचिन वाझे सुद्धा म्हणत नाहीत, मग CBI, ED कारवाई कशाला? - काँग्रेस
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हाच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा रोष मराठा समाजाने ठाकरे सरकारवर काढला. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून नव्या प्रयत्न केले जात आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (११ मे) सायंकाळी ५ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. मध्यतंरी झालेल्या वादानंतर ही पहिल्यांदाच ही भेट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | मुंबईकरांसाठी थेट परदेशातून लसी मागवण्यासंदर्भातील चाचपणी सुरु
राज्याच्या कोरोनास्थितीबाबा एक अत्यंत दिलासादायक बातमी येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात वाढलेले संसर्ग आता नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत असून राज्यतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत आहे. राज्यातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा तब्बल महिन्याभराहून अधिक काळानंतर आज (१० मे) थेट ४० हजारांच्या खाली गेला असून राज्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
4 वर्षांपूर्वी -
संकटकाळात आधी स्वत:चं कुटुंब, आर्थिक व्यवस्था आणि मग लोकांना मदत करा - गडकरी
राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षातील सहकार्त्यांना एक महत्वाचा आणि आपुलकीचा सल्ला दिला आहे. देशभरातील अनेक पक्षातील मंत्री, आमदार, खासदार तसेच नगरसेवकांनी कोरोना आपत्तीत स्वतःचा जीव गमावला आहे. लोकांना मदत करणं यात काही वावगं नसलं तरी त्यालाच अनुसरून गडकरांनी काही अग्रक्रम ठरवून दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांची तीन स्वतंत्र तक्रारींवर ‘एसीबी’कडून गोपनीय चौकशी सुरु
विवादित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास परमबीर सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं की...
मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | नाशिकमध्ये 12 मे पासून 10 दिवसांचा कडक लॉकडाउन
नाशिक जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 12 मे रोजी 12 वाजल्यापासून 22 मे पर्यंत 10 दिवस जिल्ह्यातील मार्केट पूर्णपणे बंद पाडले जाणार आहे. या लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार - विजय वडेट्टीवार
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या विरोधात गेल्याचं दिसून येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींचा सल्ला राज्यातील १०६ बेरोजगार, लावारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनी सुद्धा अंगीकारावा!
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सध्या राजकारणातले वर्तृळात चर्चेचा विषय ठरले आहेत. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS