महत्वाच्या बातम्या
-
कोरोना आपत्ती | केंद्रीय नीती आयोगाकडूनही मुंबई महानगरपालिकेच्या कामाची स्तुती | फडणवीस, दरेकरांना चपराक
मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेसमोर रोज नवे प्रश्न उभे राहताना दिसत असून, बेड, रेमडेसिवीरपाठोपाठ ऑक्सिजनसाठी सगळीकडे ओरड होताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातसह विविध राज्यांत ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत असल्याने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. न्यायालयाने सरकारला करोनाविरोधातील उपाययोजनांवरून खडसावत १२ सदस्यांची एक राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयावरून शिवसेनेनं भाजपला सवाल करत आजच्या (१० मे) अग्रलेखातून चिमटा काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. ही समिती नेमल्यानंतर विरोधकांनी या समितीला कोणतेही अधिकार नसल्याचे सांगत अनिल देशमुख यांची चौकशी निव्वळ फार्स असल्याचे म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या मुळावर आल्याने आरक्षण रद्द झालं - सविस्तर
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या विरोधात गेल्याचं दिसून येत आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या प्रत्येक मुद्द्यावर काय भाष्य केलं? त्याचा घेतलेला हा आढावा.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांनी आजपर्यंत ११० योद्धे कोरोनामुळे गमावले, तर राज्यात एकूण ४२७ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू
राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 82 हजार 266 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213 इतका खाली आला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
किती तो द्वेष? | निकम्मा पराक्रम PM केअरचा, पण भातखळकरांना व्हेन्टिलेटर्सचा मूळ विषय समजला नाही?
भाजपचे अभ्यासू राजकारणी सध्या कोणत्या विषयात हात घालून आणि विषय समजून न घेता आदळआपट करतील हे सांगता येणार नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील पुन्हा तसाच प्रकार केला आहे. नाशिकसाठी पीएम केअर फंडातून मिळलेल्या ६० व्हेन्टिलेटर्सबाबत विषय समजून न घेताच त्यांनी हास्यास्पद ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे कि, “केंद्र सरकारच्या नावाने रोज ठणाणा करायचा आणि जे मिळालंय त्याची अशी नासाडी करायची तूर डाळ असो वा व्हेंटिलेटर….ठाकरे सरकार, निकम्मा कारभार.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा, राज्याच्या कोरोना लढ्याची पंतप्रधानकडून स्तुती
कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्याच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं. महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या विषयावरून पत्र
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानं महाराष्ट्र सरकारसमोर नव्या पेच उभा ठाकला आहे. कोर्टाच्या निकालानंतर मराठा समाजामधून नाराजीचा सूर उमटत असून, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला जात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रत या विषयावर चर्चा सुरू असून, खासदार आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | नवा मागासवर्गीय आयोग स्थापून, आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता सरकारी हालचालींना वेग आला असून राज्य सरकार आता मागारवर्ग आयोग स्थापन करण्याची शक्यता आहे. या आयोगाचा अहवाल राज्य सरकार राष्ट्रपतींकडे पाठवेल आणि मराठा समाजाला त्या माध्यमातून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगण्यात येतंय.
4 वर्षांपूर्वी -
तारीख ३० जुने २०१८ | चंद्रकांतदादा म्हणाले होते 'मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारच्या हातात नाही'
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षण खटल्यात बुधवार, ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायासन क्रमांक ५ येथे हा निकाल घोषित करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात आला आणि समस्त मराठा समाजाला धक्का बसला होता.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यात रुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय
महाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारच कायदा करू शकतं | भाजप खासदारांनी पुढाकार घ्यावा अन्यथा त्यांना ठोकणार - हर्षवर्धन जाधव
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षाने टीकेची तोफ डागली. तसेच, मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला. मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावरुनच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाशी लढण्याची जवाबदारी राज्य सरकारांची | मोदींची जवाबदारी फक्त निवडणुका लढण्याची - काँग्रेस
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय - उपमुख्यमंत्री
लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे पुण्यात लहान मुलांसाठी रुग्णालय राखीव करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटू - उपमुख्यमंत्री
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपचे १०६ आमदार, २३ खासदार | उदयनराजे म्हणाले सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमदार मनोरा वसतिगृह पुनर्बाधणीचा निर्णय फडणवीस सरकारने २०१८ ला घेतलेला | विलंबामुळे राज्याचं ७०० कोटींचं नुकसान
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आमदार मनोरा वसतिगृह पुनर्बाधणी प्रकल्पावरून राज्य सरकारला लक्ष केलं होतं. यासंदर्भात त्यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की, या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय, सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात १ लाख ४७ हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह | ७५ हजार मुलं केवळ २ महिन्यात संक्रमित झाली
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. व्हायरसने आता बालकांनाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार राज्यामधून 1 ते 10 वर्षांच्या 1 लाख 47 हजार 420 मुले आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेले आहेत. मुलांमध्ये संक्रमण पसरण्याचे प्रकरण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळाले.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासाठी कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन केंद्र सरकारने थांबवला - आरोग्यमंत्री
राज्यातील कोरोनास्थिती आव्हानात्मक आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण आहे. अगदी लसींपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आहे. या गंभीर स्थिती केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जात असताना आता राज्य सरकारपुढे एक अडचण निर्माण झाली आहे. कारण, केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ५० मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकातच रोखण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL