महत्वाच्या बातम्या
-
सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (३ मे) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप केले होते.
4 वर्षांपूर्वी -
सुजय यांनी व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा केला, मी कसं स्वत:चं वजन वापरलं हा दिखाऊपणा केला - न्यायालय
एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले. सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलची भाव वाढ सुरु - काँग्रेस
देशातील ४ राज्यांमधील आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका आता संपल्या आहेत. त्यात प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या प्रमुख तीन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. केवळ आसाम राखण्यात त्यांना यश आलं आहे. तर पुद्दुचेरीत आधीच पक्ष फोडाफोडी करून जे घडलं होतं तेच घडलं. मात्र निकालानंतर मोदी-शहा यांची राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता त्याचे इतर परिणाम देखील सुरु झाले आहेत आणि ते थेट सामान्य लोकांशी संबंधित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
दिलासादायक | राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येतंय, मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बारामतीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. बारामतीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फक्त हॉस्पिटल व मेडिकल दुकानं आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ठराविक वेळच खुली राहणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच आता खंडणी म्हणजे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. 2018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर
आज एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे”.
4 वर्षांपूर्वी -
त्या धमकीतून ED, CBI, न्यायालयं आमच्या हातात आहे असं चंद्रकांत पाटील यांना सुचवायचं आहे का? - भुजबळ
आज एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे” असं भुजबळांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या प्रचार सभानंतरही केरळ'मध्ये भाजपाला भोपळा | पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा २ जागी विजय
केरळमध्ये सत्ताधारी LDF ने पुन्हा सत्तेचा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या LDF ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला. 140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी LDF ने 94, काँग्रेसने 39, भाजप शून्य आणि अपक्ष-इतर 06 असं चित्र पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
देशातील 'ती' श्रीमंत शक्तिशाली आणि दिग्गज राजकीय हस्थी म्हणजे 'शिवसैनिक' | इंडिया टुडेच्या पत्रकाराचा हास्यास्पद दावा
भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं ‘सीरम’ हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली होती. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. परंतु, ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
अजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही यावेळी शुक्ला यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, चौकशीकरिता दिलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिल रोजी दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली | प. बंगालची जनता कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही - शिवसेना
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही, असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लगावला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
काय म्हणावं याला? पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर १ आमदार वाढताच फडणवीसांना पुन्हा सत्तांतराची स्वप्नं
पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ‘बुडत्याला काठीचा आधार’ असाच निष्कर्ष काढता येऊ शकतो. मागील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पराभव आणि भाजपाला सोडून महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांमुळे राज्य भाजप कंटाळला होता. विशेष म्हणजे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या १०५ अतृप्त आमदारांचा आकडा १०५ वरून १०६ झाला आहे एवढाच तो फरक म्हणावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालमधील निकालापर्यंत थांबा असं म्हणणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना आता ४ वर्ष थांबावं लागणार
पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, निवडणुकांचे जवळपास सर्व कल हाती आल्यावर भाजपच्या पदरात मोठी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूलने २०७ जागांवर आघाडी घेत मोदी, शहा आणि संपूर्ण भाजपाला धक्का दिला आहे. बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
१६ व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडेंची अत्यंत कमी फरकाने आघाडी
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना स्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्यावरून भाजप खासदाराची ठाकरे सरकारला शाबासकी
राज्यातील प्रचंड आव्हानात्मक कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कौतुक केलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी काल (१ मे) थोड्याच वेळापूर्वी याबाबतचे ट्विट केले आहे. “राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावल्याबद्दल ठाकरे सरकारला शाबासकीची थाप मिळायला हवी. मला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात हॉस्पिटलही आता सज्ज झालेली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गिरीशभाऊंनी आवश्यक तेवढी लस महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर मी भर चौकात त्यांचा सत्कार करीन - गुलाबराव पाटील
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. तसेच, त्यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर महाविकासआघाडीतल्या एका नेत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनेक नगारिक कोविन अॅप वर केवळ रजिस्ट्रेशन करत आहेत, पण मेसेज आला नसतानाही लसीकरण केंद्रावर
भारतामध्ये आजपासून तिसर्या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी कोरोनाविरोधात ज्या निष्ठेने संघर्ष करत आहेत, तेवढ्याच निष्ठेने RSS स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांशी लढलेला - काँग्रेस
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लसीचा तुटवडा, पण 18 ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात | मुंबईत 'या' ठिकाणी मिळणार लस
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M