महत्वाच्या बातम्या
-
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंबंधित RTI च्या 'अतिजलद' माहितीतून शिंदे सरकारचीच पोलखोल झाली
Vedanta Project | वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गेला, याचा तपास घेण्यासाठी सदर कार्यकर्त्याने माहिती मागवल्याचे दाखवले जात आहे. मात्र सरकारने दिलेली ही माहिती पोलखोल करणारी आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी काल टाइमलाइन देऊन चर्चा करण्यासाठी समोर या म्हटलंय, त्यामुळे सरकार घाबरलंय, असा आरोप अरविंद सावंतांनी केलाय. ५ मे २०२२ रोजी वेदांताने स्वारस्य अभिव्यक्ती केली होती. 14 मे 2022 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे गुंतवणुकीबाबत अर्ज सादर केला होता, मग काहीच झालं नाही कसं म्हणता? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
2 वर्षांपूर्वी -
जातात तिथे धु-धु धुतात, आता शिंदे गटाच्या शायर नेत्याला सुषमा अंधारेंनी जळगावातच धुतलं, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला
Sushma Andhare | पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं जळगावमध्ये शिवसेनेची ताकद अद्याप कायम असल्याचा दावा शिवसेनापक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या कालपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
नुकसानग्रस्त शेतकरी राहिला बाजूला, मुख्यमंत्री गणपती, दहीहंडी, दिवाळी भेटीनंतर स्वतःच्या शेतात मुक्कामी, विशेष फोटोसेशनही
CM Eknath Shinde | राज्यातील भागात पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे पीक पाण्यात गेले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. राज्यातील शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. एका बाजूला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त शेतकरी सोडून स्वतःच्याच शेतात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पोहोचल्याच पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
उचल प्रोजेक्ट टाक गुजरातला, साल्यांनो ती बुधवार पेठ गुजरातला देऊन टाका आणि साड्या घालून फिरा, बाबाराजे भाजपवर संतापले
Shivbhakt Babaraje Deshmukh | साताऱ्याचे शिवभक्त बाबाराजे देशमुख यांनी यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्यांनी शिवसेना आमदार जाधव यांची प्रशंसा केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने जरी आमदार जाधव यांची सुरक्षा काढून घेतली असली तरी राज्यात माझ्या संघटनेचे एक लाख सदस्य आहेत. ते सर्वजण आमदार जाधव यांना सुरक्षा देतील, अशी ग्वाही दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉनमधील फरकच माहिती नाही, आदित्य ठाकरेंनी पुराव्यानिशी एक्सपोज केलं
DCM Devendra Fadnavis | विरोधक हे फेक नेरेटीव्ह पसरवत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक प्रकल्प हे राज्याबाहेर गेले. त्यातलाच प्रकल्प म्हणजे टाटा एअरबस प्रकल्प आहे. राज्यातील वातावरण गुंतवणुकीसाठी योग्य नसल्याचे गुंतवणूकदार यांचे म्हणणे होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना केला आहे. विरोधक त्यांच्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडत आहेत असे देखील फडणवीस म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
फक्त हातवारे करत बोलण्यात चलाखी, शिंदेंच्या त्या व्हिडिओकडे दुर्लक्ष, अन 2021 मधली चिटकूळ दाखवत फडणवीसांची गोल-गोल मांडणी
DCM Devendra Fadnavis | इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर केंद्र सरकारने मंजूर केलं आहे. महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेली ही भेटच आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लवकरच मला अपेक्षा आहे की नवीन वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्कही देणार आहे. त्यामुळे राज्यात टेक्सटाईल क्लस्टर तयार होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. नवीन वर्षात त्यासंदर्भात याची घोषणा करण्यात येईल असंही फडणवीस यांनी सांगितलं.
2 वर्षांपूर्वी -
लाखो कोटीचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राला अति सूक्ष्म प्रकल्प दिले, पण मार्केटिंग जोरात असंच चित्र
DCM Devendra Fadnavis | पुण्याजवळच्या रांजणगाव या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घो,णा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. या अंतरग्त दोन हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाखो कोटीचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राला अति सूक्ष्म प्रकल्प दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक महापालिकेत, ते वगळून बीएमसीतील व्यवहारांची कॅगमार्फत चौकशी, शिंदेंवर शंका वाढणार?
CM Eknath Shinde | महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता कोरोनाकाळात मुंबई महापालिकेनं मंजुर केलेल्या विकासकामांच्या आर्थिक व्यवहारांची कॅगमार्फत चौकशी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. सध्या पालिकेचा कार्यकाळ संपल्यानं प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
हे सामान्यांचं शिंदे सरकार प्रशासन?, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शवविच्छेदनासाठी कुटुंबियांकडून फोन-पेवर दीड हजाराची लाच घेतली
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काल नंदुरबार दौऱ्यावर होते. काल सकाळी त्यांच्या हस्ते नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचीही उपस्थिती होती. यानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.
2 वर्षांपूर्वी -
धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता, बच्चू कडूंच्या वक्तव्याने सर्वकाही मुख्यमंत्री पदाच्या भुकेने केल्याची चर्चा रंगली
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यवतमाळमध्ये बोलताना त्याचाच प्रत्यय आला. ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कुणाचंही नाव न घेता असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी हा टोला लगावतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अणि आमदार रवी राणा या दोघांनाही लक्ष केल्याच म्हटलं जातंय.
2 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचा 32 वर्षाचा नातू शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतोय, तर शिंदे समर्थक कृषिमंत्र्यांची चहा पित अधिकाऱ्यांशी 'दारू पे चर्चा'
MLA Bacchu Kadu | अतिवृष्ठीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हाती आलेलं पिक आडवं झालंय. दिवाळी सणाच्या तोंडावरच अस्मानी संकटात उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या बांधावर उद्धव ठाकरे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परीषद घेऊन राज्य सरकारकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे समर्थक मंत्र्यांकडून आमदार बच्चू कडूंची खिल्ली उडविण्यास सुरुवात, फडणवीस आणि शिंदे समर्थक एकवटले?
MLA Bacchu Kadu | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आधी मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपाची जोरदार चर्चा झाली. यातून ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही, त्यांच्या नाराजीचीही चर्चा झाली. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव होतं ते म्हणजे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचं. बच्चू कडू यांनी आधीपासूनच आपल्याला कोणत्या खात्याचं मंत्रीपद हवं, याबाबत सूतोवाच केले होते.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटातील मंत्र्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला निधी, शिंदे समर्थक आमदारांना पाडण्यासाठी शिंदेंच्या मंत्र्यांची फिल्डिंग, राष्ट्रवादीशी जवळीक
MLA Chimanrao Patil | शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. मात्र मंत्री पदाच्या वाटपासूनच शिंदे गटात वाद सुरु असल्याची चर्चा सुरुवातीपासून आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ऐतिहासिक महागाईने पेट्रोल पंपावर मोदींचे फोटो पाहून लोकांचा संताप होतोय, आता नोटांवर मोदींच्या फोटोसाठी भाजपची मागणी
MLA Ram Kadam | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत असं अजब वक्तव्य उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याकडून करण्यात आलं आहे. गुलाब देवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत. असं गुलाब देवी यांनी म्हटलं आहे. गुलाब देवी एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर मोदी हवं तोपर्यंत पंतप्रधान पदावर राहू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता गुलाब देवी यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून, विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवू शकतात. यापूर्वी देखील अनेकदा असे वाद निर्माण झाले आहेत. त्यानंतर अजून अजब मागण्या पुढे येतं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्विवाद महापुरुष आहेत. पण मोदी केव्हा महापुरुष झाले? कारण सतत वायफळ मुद्यांवर केंद्रित असणारे भाजपचे आमदार राम कदम पुन्हा त्यांच्या संतापजनक मागणीने चर्चेत आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंची वाचून भाषण करण्याची शैली खेळ बिघडवणार हे ध्यानात येताच भाजपने रचली 'शिंदे-मनसेच्या तारा' जुळवण्याची स्क्रिप्ट
MNS Shinde Camp Alliance | शिंदे गटाच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याने भाजपसमोरील आगामी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सभेदरम्यान लोकांना खिळवून ठेवण्याची भाषण शैली नाही हे भाजपासमोर स्पष्ट झालं आणि त्यात एका स्थिर सभेत शिंदेंना संपूर्ण भाषण वाचून करावं लागल्याने ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारावेळी एकामागून एक धावत्या सभांमध्ये शिंदे काय गोंधळ घालतील याची प्रचिती भाजपच्या नेत्यांना आली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सभांमधून लोकांना खिळवून ठेवणं अत्यंत गरजेचं असेल आणि त्यासाठी शिंदे-मनसेत ‘राजकीय तारा’ जोडण्याचं निश्चित झाल्याचं भाजपातील महत्वाच्या नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
जनतेचं सरकार असल्याचं सांगणाऱ्या शिंदे सरकारच्या जनतेला दिवाळीत टोप्या, 'आनंदाचा शिधा' पाकिटातून गोड तेलाचा पुडा गायब
Anandacha Shidha | दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य गरिब जनतेला दिलासा मिळावा यासाठी मोठा गाजावाजा करत शिंदे सरकारने आनंदाचा शिधा वितरण सुरू केले आहे. पण गोंधळ उघड झाल्यावर हा आनंदाचा शिधा ऑफलाईन पद्धतीने वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा झाली.
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांची कर्जमाफी... ती बँकच अस्तित्वात नाही? शिंदे-फडणवीस सरकारची शरद पवारांकडून पोलखोल
NCP President Sharad Pawar | राज्यात सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी प्रचंड संकटात आहेत. त्यामुळे काल माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे आसूड फक्त हातात ठेवू नका तो वापरा, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्य सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं. त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वातावरण ढवळून निघालं आहे.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेतील फुटीची तुलना थेट इंडिया-पाकिस्तान मॅचसोबत केली, मराठी नेटिझन्सकडून शिंदेंविरोधात दिवाळीत शिमगा
CM Eknath Shinde | टीम इंडियाने कालच्या सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे देशवासियांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कालच्या सामन्यामुळे प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील फुटीची तुलना थेट इंडिया पाकिस्तान मॅच सोबत केल्याने समाज माध्यमांवर त्यांच्यावर भर दिवाळीतही जहरी टीका सुरु झाली आहे. अनेक प्रसार माध्यमांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवरून नेटिझन्स शिंदेंना झापताना दिसत आहेत. तसेच दहीहंडी पासून सुरु झालेलं एकच पुराण आता बंद करा असं देखील अनेकांनी म्हटलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
कृषीमंत्री रस्त्यावरून जातात पण गावात आणि शेतात येत नाहीत, सरकारने वाऱ्यावर सोडलं, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कृषि मंत्र्यांवर आरोप
Minister Abdul Sattar | परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे मुंबई बाहेरच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यापूर्वी घडलेल्या एका घटनेची सध्या प्रचंड चर्चा होतेय, ती म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी घेतलेली शेतकरी कुटुंबाची भेट. आता या भेटीचा संबंध थेट उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी लावला जातोय.
2 वर्षांपूर्वी -
शिंदें समर्थक आमदारांनी 50 खोके घेतल्याचे थेट आरोप, फडणवीस समर्थक आमदाराकडून शिंदें समर्थकांची पोलखोल सुरु
50 Khoke Ekdum Ok | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. त्यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार देखील कोसळलं. परिणामी विधानसभा पावसाळी अधिवेशन ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेमुळे गाजलं. विरोधकांनी केलेल्या या घोषणेमुळे सत्ताधाऱ्यांनी धक्काबुक्की देखील केली होती. या घोषणेचे पडसाद अगदी यंदाच्या गणेशोत्सवावर देखील पाहायला मिळाले. याचिच प्रचिती देणारं भजन देखील समाज माध्यमांवर पाहायला मिळाली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या